न्यायालयाच्या आदेशाने अखेर रामतीर्थ पोलीस स्टेशनने दारू साठा नष्ट केला.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
रामतीर्थ पोलिसांनी 2011 पासून ते 2020 पर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून जप्त केलेली 33 गुन्ह्यातील सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयाची देशी व विदेशी दारू न्यायालयाच्या आदेशानंतर बिलोली येथील राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक एस एम बोधनवाड यांच्या अधिपत्याखाली वरामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे, मोरीयल शिवाजी मैलापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामतीर्थ पोलीस ठाण्यात हा दारू साठा दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास नष्ट करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात चालणाऱ्या अवैध देशी व विदेशी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून विदेशी किंग प्रेशर आणि देशी दारू जप्त केलेली सुमारे 33 गुन्यातील 2011 पासून ते 2020 पर्यंतची जप्त करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दारू साठा नष्ट करण्याचे बिलोली न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक एसएम बोधनवाड यांच्या अधिपत्याखाली खिल्लारे व्हि. टी. जवान संगेवार, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे, मोरीयल शिवाजी मैलापुरे यासह रामतीर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती रामतीर्थ पोलीस ठाण्यात 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक लाख चाळीस हजार रुपयाची देशी व विदेशी दारूचा रामतीर्थ पोलीस ठाण्यात असलेला साठा नष्ट करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या