दारूमुक्त मोहल्ला अध्यक्षपदी शेख मैनोदीन तर उपाध्यक्षपदी मोहम्मद अफजल यांची निवड.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील शतरंजीगल्ली दारूमुक्त मोहल्ला आणि मुस्लिम समाजबांधव आपले आयुष्य दारूचा आहारी जाऊन उध्वस्त करूनय या उदांत्त हेतु डोळ्यासमोर ठेवून सर्व मुस्लिम समाजबांधवांचा पुढाकारातून दारूमुक्त मोहल्ला कमेटीची स्थापणा करण्यात आले.या कमेटीचा अध्यक्षपदी शेख मैनोदीन हाजी मगदूमसाब तर उपाध्यक्षपदी पत्रकार मोहम्मद अफजल हाजी मोहम्मद इब्राहिमसाब तर सचिवपदी शेख वाहाब सिराजोदीन यांची सर्व समाजबांधवांचा उपस्थित बिनविरोध निवड करण्यात आले.
या कमेटीचे सदस्य नजीर मौलाना पठाण,बाबूभाई मोहम्मद साब,,मोईन खाजामियाॅ,शेख जमाल बालेसाब,पाशाभाई मौलाना पठाण,शेख शमशोदीन हसनमियाॅ,रियाज मैनोदीन पठाण,शेख युसूफ खाजामियाॅ,शेख युनूस बाबूमियाॅ आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.कमेटीतर्फे आपल्या गल्लीतील एकूण कुटूंबा पैकी एकही सदस्य दारू व जुवाच्या आहारी जावूनये यासाठी सर्वानी दक्षता बाळगावी.अशी विनंती वजा आवहान करण्यात आले.यावेळी शतरंजीगल्लीतील सर्व मुस्लिम जेष्ठ व तरूणांनी दारूमुक्त मोहल्ला स्थापण करण्यासाठी आम्ही कमेटी सोबत असल्यांची ग्वाही दिली.
विशेष म्हणजे व्यसनाचा आहारी जाऊन अनेक तरूण समाजातील जेष्ठ नागरीकांशी सह जन्मदात्यांसोबत उद्धट वर्तवणूक व कायद्याचे उल्लंघन करीत असे या सोबत व्यसनांने अनेकांचे संसार उद्ध्वस्त व उघड्यावर येत आहे.हि बाब प्रत्येक समाजासाठी कलंकित ठरत आहे.यासाठी आपला मोहल्ला दारुमुक्त करावे हि बाब सर्वात आगोदर गल्लीतील शेख वाहाब सिराजोदीन,पत्रकार मोहम्मद अफजल हाजी.मोहम्मद ईब्राहीम साब,नजीर मौलाना पठाण,बाबूभाई मोहम्मद साब,मोईन खाजामियाॅ,हबीब भाई मियाॅसाब,जमालबाई बालेसाब यांच्या विचारात आले.
याबाबत गल्लीतील सर्वमंडळी सर्व कुटुंबातील सदस्यांना चार दिवस आगोदर यासबंधी बैठकीची सुचना दिली.दि.24 ऑगस्ट 2023 रोजी शतरंजीगल्ली ईमामेखासम आशुरखाना येथे बैठक घेण्यात आले. उपस्थित गल्लीतील तरूण, जेष्ठ आदींचा मर्जीने दारूमुक्त मोहल्ला कमेटी स्थापण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. अशी ग्वाही दिली. एकंदरीत शासन आपकारी महसुलात वाढ करण्यासाठी अनेक दारूदुकानाचे, वाईनशाॅप, शिंदी डेपोचे परवाने देत आहे.
प्रशासनातील अधिकारी नियमाचे उल्लंघन होत असताना,आर्थीक लाभासाठी याबाबीकडे  जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.यामुळे अनेक तरूण व्यसनाचा आहारी जावून आपले आयुष्य उध्वस्त करूनय घेत आहे.
त्यांचे संसार उघड्यावर येत आहे.यास लगाम घालण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक समाजाचा पुढाकारातून दारूमुक्त मोहल्लाच नाही तर दारूमुक्त गाव,शहर निर्माण करण्याची संकल्पणा निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यसन विरोधी नागरीक बोलून दाखवत शतरंजी गल्लीतील दारूमुक्त मोहल्ला उपक्रामाचे कमेटीचे व त्यात सहभागी तरूण,जेष्ठ नागरीकांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या