लिटल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हरी गजराने दुमदुमली नायगाव नगरी.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील लिटल स्टेप्स इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्याने आषाढी एकादशी निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांची दिवाळी सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त नायगाव शहरातील नामांकित लिटल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देत सर्वधर्मसमभावाची जोपासना करीत मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद व आषाढी एकादशी या दोन्ही सणाचे अवचित्य साधात विद्यार्थ्यांनी भव्य शोभायात्रा काढली.

या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण विठुरायाच्या गजरात पंढरीचा हरी गजर करत चिमुकल्यांनी विविध संतांच्या रूपात आज नायगाव शहर पंढरीमय केले. या शोभा यात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभाराची विठ्ठलाच्या भक्तीचे नृत्य सादर करून परिसरातील जनतेचे मन जिंकली.पंढरीच्या वारीतील पालखीला ज्या पद्धतीची सुरक्षा पुरवली जाते त्याच पद्धतीच्या सीआरएफ जवानांच्या सुरक्षेच्या तुकडीने पालखीची सुरक्षा दाखवण्यात आली.

हिंदू ,मुस्लिम,शीख, ईसाई…
हम है सब भाई भाई …
या उक्तीप्रमाणे सर्व धर्मीय विद्यार्थ्यांचा समावेश या शोभायात्रेचे आकर्षण ठरले.लेझीम पथक,वारकऱ्यांचे पथक, वृंदावन धारक संत महिला,पताकेधारक युवक,असे अनेक देखावे या शोभा यात्रेमध्ये सहभागी होते. यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना साईनाथ सावकार वाटमवार,प्रहार संघटनेचे मुंढे,धनंजय सावकार कवटीकबार,बाबू मामा हॉटेलवाले ,संजय गायकवाड केळीवाले यांनी खाद्यपदार्थ वाटप केले.
शोभायात्रेतल्या पालखीची पूजा मा.श्री श्रीनिवास पाटील चव्हाण (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव) यांच्या हस्ते करण्यात आली पूजनासाठी माजी नगरसेवक रमेश पाटील शिंदे, माजी नगराध्यक्ष शरद भालेराव नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, विश्वनाथ पाटील तमलूरे उपस्थित होते. शासनाच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या शोभायात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शोभायात्रा विठ्ठल व हनुमान मंदिर जुने गाव नायगाव येथे संत कान्होपात्रा च्या रूपामध्ये साक्षी शिवा रेड्डी हिच्या मनोगताने सांगता झाली.
ही आषाढी एकादशीची शोभायात्रा यशस्वी करण्यात शाळेचे प्राचार्य कुणाल गारटे सर यांनी मार्गदर्शन केले तर सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी सांस्कृतिक विभाग यांनी परिश्रम घेतले तर सर्व वाहन चालकांनी सहकार्य करून शोभायात्रा यशस्वी केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या