जीवन जगण्याच्या शुद्धीकरणाला किर्तन म्हणतात – चंदू महाराज !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील लालवंडी कै .शंकरराव शिवरामआप्पा पाटील लंगडापूरे यांच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ हभप . चंदु महाराज लाठकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .. प्रस्तुत किर्तन सेवेसाठी तुकोबांरायाच्या अभंगाची निवड व मांडणी अतिशय सर्मपक पणे केली.
संसाराच्या अंगी …….. अवघेची वेसने, आम्ही या किर्तने शुध्द झालो. या अभंगाचे अप्रतिम विवेचन त्यांनी आपल्या मधूर वाणीतून केले. अनेक दृष्टांत दिले. संसाराचा पसारा मोठा असतो ते करता करता, सावरता सावरता खूप काही राहून जाते आणि माणूस मनासारखे झाले नाही म्हणून, कधी दुःखी तर कधी सुखी होतो.
या कार्यक्रमासाठी परीसरातील भजनी मंडळी, गायक, विष्णु तांदळीकर, जर्नाधन बेद्रींकर, वादक मृंदगाचार्य विसू महाराज, बासरी वादक दोर्णाचार्य, या प्रसंगी प्रमूख अतिथी, हानमंतराव पाटील चव्हाण, मा .पंचायत समिती सदस्य, माधव आप्पा बेळगे माजी जि.प. सदस्य, देविदास पाटील बोमनाळे, गंगाधरराव पोलीस पाटील, शंकराव कल्याण शहरप्रमूख, माधव पाटील, ह .भ.प. त्र्यंबक स्वामी गुरुजी, बालाजी भोसकर गुरुजी, चंद्रकांत अमलापूरे, वसंत माने सर, श्रीनीवास जवादवार शेठ, लाबशेटवार सावकार, मनोज सावकार शंकर लाब्दे, संजय बोमनाळे, कार्यक्रमाचे आयोजक बाबूराव पाटील लंगडापूरे माजी जिप सदस्य, भगवान पाटील लंगडापूरे आडत व्यापारी असो. अध्यक्ष अॅड . नारायण लंगडापूरे, व्यापारी मित्रमंडळ, आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली .
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या