लोह्यात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नवदुर्गा,कोरोना योद्धा सन्मान पत्र वाटप!

( लोहा प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे )

लोह्यात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा. उषाताई खापरे यांच्या संकल्पनेतून सौ.सविता ताई कुलकर्णी,कल्पनाताई डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महिला मोर्चा ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्षा रेखाताई शाहूराज गोरे यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे महिलांच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या सविताताई नागलगावे यांच्या सौजन्याने आज लोहा येथे नवदुर्गा सन्मान, कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी लॉकडाऊन कालावधीमधील घेतलेल्या अपार मेहनतीचे व नगरपरिषद प्रशासन पत्रकार बांधवांचे केलेल्या कार्याचे अनुभव कथन केले. स्वतः कोविड रुग्ण म्हणून आलेले अनुभव कथन केले.महिला सक्षमीकरण विषयी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले.

चित्ररेखाताई गोरे यांनी अध्यक्षीय भाषणातून भाजपाच्या महिला सक्षमीकरण, जनजागृती, कोरोना महामारी, स्व च्छता, बचत गट, कोविड योद्धे, चिखलीकर साहेबांच्या कार्याचा आढावा आदी विषयावर भाष्य केले.

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शेती करणारी महिला, बचत गटातील महिला, पोलीस, डॉक्टर , ब्रह्मकुमारी ,अपंग स्त्री शिक्षिका,पत्रकार यांना पो.नि.भागवत जायभाये व चित्ररेखाताई गोरे यांच्या हस्ते उपस्थितांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास म्हणून अध्यक्ष भाजपाच्या निष्ठावंत सक्रिय कार्यकर्त्या चित्ररेखाताई शाहूराज गोरे,प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पोलीस ठाण्याचे पो. नि.भागवत जायभाये, डॉ. सौ मनीषा जवळगेकर, डॉ.संगीता कपाळे, सौ. रेखा पेनुरकर, वैजनाथ पांचाळ पो. पा.,डफडे कॉन्स्टेबल,सविता जोंधळे,सुनिता गीतेआदींसह भाजपाच्या महिला मोर्चा च्या लोहा तालुका अध्यक्षा सविता सातेगावे,शहर अध्यक्षाअर्चना सूर्यवंशी, शोभा बगडे, सामुदायिक संघटक उषाताई शिंदे यासह प्रमुख महिला पदाधिकारी प्रसंगी उपस्थित अर्चना सूर्यवंशी,उषा लोखंडे, प्रभावती जाधव,लक्ष्‍मीबाई पंपलवाड, वंदना जोंधळे, सुमनबाई धुळगंडे, प्रभावती जाधव, अनिता कवडे ,लक्ष्मीबाई टोकलवाड,मीना जाधव, मंडोदरी टाळीकुठे,आदींसह मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

*massmaharashtranewsnetwork*

ताज्या बातम्या