उजळून निघाला लोह्यातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक लख्ख प्रकाशाने !!

( विशेष प्रतिनिधी /रियाज पठान )

दि.28,लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खूप दिवसापासून बंद पडलेल्या हायमॅक्सचे काम नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष तथा भाजपा लोहा तालुकाध्यक्ष शरद पा.पवार, नगरसेवक दत्ता वाले,जिवन चव्हाण वार्डातील अन्य सदस्यांच्या पुढाकाराने साडेसात वाजता लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, प्रदिप निलावार आदींच्या उपस्थितीत अखेर काम पूर्ण झाले.

लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित हायमॅक्स लाईट अनेक दिवसांपासून बंद पडला होता.त्यामुळे लोहा शहरातील मुख्य चौकात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.त्यातच पुर्णवेळ मुख्याधिकारी गंगाधर पेंटे नियुक्ती झाल्यावर त्यांनी लोहा वासियांना सर्वांच्या सहकार्याने आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

लोह्यातील मुख्य चौकातचअंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लोहा शहरातील मुख्य ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला,वृद्ध,प्रवासी वर्ग,घावूक किरकोळ व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक यांच्यात अंधाराच्या साम्राज्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.अनेकांच्या पुढाकारानेआज अखेर लोहा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकस्थित बंद पडलेले हायमॅक्स पुन्हा पुर्ववत चालू करण्यात आले.अंधाराचे साम्राज्य नाहीसे होवुन छ्त्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.

यावेळी लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण,दिनेश तेललवार, प्रदिप निलावार आदींसह बहुसंख्य उपस्थिती होती.

ताज्या बातम्या