लोहा येथील एस.बी.आय.ग्राहक सेवा केंद्र व शिव ऑनलाइन सेन्टर येथे झाली चोरी .पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
लोहा येथील मुख्य बाजार पेठेतील एस.बी. आय.ग्राहक सेवा केंद्र शिव ऑनलाइन सेन्टर चे मालक किसन सावळे व संदीप सावळे यांच्या एस.बी.आय. ग्राहक केंद्रात झाली चोरी. दुकानदारांनी दि- 04 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी 8 वाजता दुकान बंद करून तालुक्यातील लहुजी नगर येथे आपल्या घरी गेले.
दुसऱ्या दिवशी कटिंग सलून चालवणारे विष्णुकांत नामदेव चमकोरे यानी फोनद्वारे दुकान मालकास कळविले की, तुमच्या ग्राहक सेवा केंद्राचे अर्धवट शेटर उघडलेले आहे. हे कळताच दुकान मालक व त्यांचे भाऊ धावत दुकानाकडे येऊन बघितले तर शटरचे कुलुप तोडुन अर्धवट शटर उघडलेले दिसले आत मध्ये जाऊन पाहणी केली असता तेथील दोन लॅपटॉप व 2000 रुपये असे एकूण रक्कम 32000 रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने SBI ग्राहक सेवा केंद्राचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दोन लॅपटॉप व 2000 रुपये चोरुन नेले असल्याचे समजले तरी अज्ञात चोरट्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी माहीती किसन सावळे यांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास चालु असल्याची माहिती मिळाली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या