शालेय साहित्य खरेदीत ग्रामसेवक-सरपंचानी केली दीड लाखाची अफरातफर !

( विशेष प्रतिनीधि लोहा/रियाज पठान )

शासनाने जि प शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी ग्राम पंचायत च्या 14 व्या वित्त अयोगा च्या निधीतून वीस टक्के खर्च करण्याचे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतिला दिले आहे.

रामतीर्थ येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी शालेय व्यवस्थापन समितीला विचारात न घेता परस्पर सरपंच व ग्रामसेवकांनी आर्थिक हातमिळवणी करून 14 व्या वित्त आयोगातून केवळ 40 हजार रुपयांचे साहित्य खरेदी करून दोन लक्ष रुपयांचा निधी उचलला असून एक लक्ष 59 हजार रुपयांच्या निधीची अफरातफर केली आहे, अशी तक्रार शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संतोष भीमराव धूळगंडे यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .


निवेदनात नमूद केले आहे, की जी प शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी ग्रामपंचयाती च्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून दरवर्षी वीस टक्के खर्च करणे बंधनकारक केले आहे. खर्च करताना शाळेला कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे याची माहिती शालेय व्यवस्थापन समिती कडून घ्यावी नंतर गरजेनुसार कामे साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे असे असताना रामतीर्थ येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी 14 वा वित्त आयोगाचा निधी हडप करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती ला विश्वासात न घेता शाळेला गरज नसताना 40 हजार रुपयांची निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी केली आणि बिल मात्र दोन लक्ष रुपयांचे उचलून घेतले. यात एक लक्ष 59 हजार रुपयांचा अफरातफर केली आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संतोष भीमराव धूळगडे यांनी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांच्या कडे केली आहे.

ताज्या बातम्या