नगराध्यक्षच जर ठेकेदार झाला, तर हे होणारच ! लोहा आग घटनेबाबत माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांचा आरोप!
विशेष प्रतिनीधी/ रियाज पठान
—————————————-
सन 2018 पर्यंत ज्या लोहा शहरातील घनकचऱ्याचं टेंडर हे प्रति महिन्यासाठी 4 ते 5 लक्ष रुपयापर्यंत असायच, परंतु भ्रष्ट अश्या ह्या नगराध्यक्षाने तेच टेंडर जिल्हाधिकारी व संबंधितांना कचऱ्याचं विलगीकरण करणार, विघटन करणार, खत निर्मिती करणार अस खोटं भासवून ह्यावर्षी 18 लक्ष रुपयाला गैर मार्गाने टेंडर प्रक्रिया करून मंजूर करून घेतलं, झालं मग काय रोज सकाळी जुन्या बॉडी च्या काळातील घंटा गाड्याच सायरन वाजवून , कचरा जमा करून काही कचरा मुख्य रस्त्यालगत टाकणे व काही कचरा नव्याने बांधलेल्या घनकचरा डेपो मध्ये नेऊन जाळून टाकणे व महिन्याला 15 लक्ष रुपये गिळून टाकणे असा उद्योग सुरु होता, त्यातून शेवटी घनकचरा डेपो ला आग लागून ते भस्म होऊन गेले, त्याच कोणासही सोयर सुतक नाही, एरवी रस्त्यावर पाणी फवारत फिरणारी फायर ब्रिगेड ची अत्याधुनिक गाडी सुद्धा बेपत्ता होती म्हणून आग आटोक्यात आणता आली नाही , म्हणून म्हणलं नगराध्यक्षच जर ठेकेदार झाला तर हे होणारच असा आरोप लोहा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केला आहे.