लोहा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर !

○ खा.चिखलीकर,आ श्यामसुंदर शिंदे,माजी आ रोहिदास चव्हाण,प्रा.मनोहर धोंडे विजयी उमेदवार भेटीस ! ○

( विशेष प्रतिनिधी / रियाज पठान )

तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती मधील ७७४ सदस्य जागेची शासकीय आय.टी.आय मध्ये सकाळी १० वाजे पासुन २७ टेबलरुन मतमोजणीला सुरुवात झाली.

अनेक गावचे धक्कादायक निकालाची सुरुवात होताच पहिल्याच निकालाने बोरगावने कौल दिला संरपंच संघटनेचे मारोती पाटील बोरगावकर यांचा पराभव झाला या बातमीने अनेक कार्येकर्त्याचे डोके सुन्न झाले.आजीत बोरगावकर यांचे बहुमत आले.

शेवडी ग्रामपंचायत चा गड मनोहर धोंडे यांच्या ताब्यात पंचविस वर्ष ताब्यात होता तो गेल्या वेळेस हुकला होता पण यावेळेस बहुमताने ताबा मिळवला.

अनेक ठिकाणी सत्ताधारी पॅनलचा धुव्वा उडवत नवतरुनांनी बाजी मारली भाजपचे खा.प्रताप चिखलीकर व माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी अनेक ग्रामपंचायतीवर आपला दावा सांगीतला.

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर व भाजपचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्प व गुलालाची उधळण करुन सत्कार करण्यात येत होते.

तसेच माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित सदस्य सुनेगाव, डोंगरंगाव, जवळा,तिरोडा,पेनुर आदि विजयी उमेदवार सदस्यांनी माजी आ.रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली.

आ.श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे याच्या नेतृत्वाखाली पॅनल उमेदवारांचा संपर्क कार्यालयात हार घालून करुन सत्कार करण्यात आला.

शिवा संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी शेवटी देऊळगाव या ग्रामपंचायती मध्ये निर्विवाद सत्ता स्थापनेचा आपल्याचा नेञत्वाचा दावा केला आहे.

        राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचे लोहा कंधार विधानसभेचे संर्पक प्रमुख बाळासाहेब क-हाळे व लोहा शिवसेनेचे तालुका प्रमुख मिलींद पवार यांनी विजयी ग्रामपंचायतवर दावा केला आहे.

परंतु माळाकोळी,आष्टुर,माळेगांव,सावरगाव (न), बोरगाव(आ),कंलबर,सायळ,धानोरा(म),शेवटी(बा),पेनुर,धावरी, किरोडा,सुनेगाव, सत्ता परिवर्तन झाल्याचे  बोलले जात आहे.

चार गावातील एका एका सदस्याला समसमान मत मिळाल्याने चिठी काढुन विजय उमेदवाराचे नशिब आजमावले गेले. यामध्ये आंबेसांगवी मध्ये कदम गणपती किशन,जवळा- गच्चे शंकर,कलंबर -घोरबांड ज्ञानेश्वर, पिंपळदरी -जाधव मारोती यांचा निकाल  चिठ्ठयांवर काढण्यात आला.

मतमोजणी उपविभागीय जिल्हाधिकारी पि.एस.बोरगावकर, देवकुळे, तहसिलदार विठ्ठल परळीकर,नायब तहसीलदार राम बोरगावकर,अशोक मोकले,नायब तहसिलदार देवराये,मुंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली.

या ठिकाणी पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली चौख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच शहरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

ताज्या बातम्या