लोहा, कंधार तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आमदार शामसुंदर शिंदे यांना ग्वाही !

  • लोहा शहर प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे  ●

दिनांक 9/9/2020
लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल गुरुवारी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून लोहा, कंधार मतदार संघातील आरोग्यविषयक सोयी-सुविधा व प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करणे तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन काल गुरुवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले असता, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोहा, कंधार तालुक्यातील आरोग्य विषयक व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करून लवकरच नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून तोडगा काढला जाईल व लोहा ,कंधार तालुक्याच्या आरोग्य विषयक मूलभूत गरजेसाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांना ग्वाही दिली सध्या लोहा कंधार तालुक्यातील दवाखान्यातील अपुरे अधिकारी व कर्मचारी यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल गुरूवारची आरोग्य मंत्री राजेश टोपे व आमदार शामसुंदर शिंदे यांच्या भेटीमुळे लोहा कंधार तालुक्यातील आरोग्य यंत्रणा नक्कीच सक्षम होणार असून दोन्ही तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधेसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता लवकर दूर होणार असल्याचा विश्वास आमदार शामसुंदर शिंदे यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या