सरपंच प्रतिनिधी भीमराव जोंधळे यांच्या कडून ‘वाचन प्रेरणा दिनी’ वृक्षसंगोपन जाळींची शाळेला भेट!

विशेष प्रतिनिधी / रियाज पठान

तालुक्यातील किरोडा येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले सरपंच प्रतिनिधी भीमराव संभाजी जोंधळे यांनी मिसाईल मॅन भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जि.प.उ.मा. वि./वस्तीग्रह लोहा येथील वृक्ष संगोपनासाठी पाच वृक्ष संगोपन जाळींची भेट देऊन गावपातळीवरील ग्रामपंचायातीने शहरी भागातील शाळेला भेट वस्तू देण्याचा लोहा तालुक्यात अभिनव पायंडा पाडलाय.
याप्रसंगी बोलताना सरपंच प्रतिनिधी भीमराव जोंधळे म्हणाले की,वृक्ष टिकले तर औक्सिजन मिळेल, पर्यायाने मानवी वस्ती जिवंत राहील. वृक्ष संगोपन ही काळाची गरज आहे. नुसते वृक्षारोपण करून चालत नाही तर टिकविता आले पाहिजे.
स्वच्छता दूत राजीव तिडके, जि. प.शाळा धावरीचे मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते बी. वाय.चव्हाण व मुख्याध्यापक जाधव मॅडम यांनी सरपंच प्रतिनिधीचे तोंडभरून कौतुक केले.
त्यातच प्रेरक संघटनेचे चळवळीतील नेते, जिल्हाध्यक्ष पांडुरंग चिखलभोसीकर व महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी भिमराव जोंधळे, मु.अ. बि. वाय. चव्हाण, डॉ.अंजना जमदाडे, मु. अ.जाधव मॅडम, राजीव तिडके,मंगल सोनकांबळे,पांडुरंग चिखलभोसीकर,संतोष चेऊलवार,पत्रकार संजय कहाळेकर, शिवराज पवार, रियाज पठाण, गोविंद पवार आदींसह शाळेचा सर्व स्टॉप उपस्थित होता.

ताज्या बातम्या