लोहा येथील जनावराच्‍या बाजारातील लुट थांबवा अन्‍यथा आंदोलन- कांग्रेस शहराध्‍यक्ष वसंतराव पवार

( विशेष प्रतिनिधी / रियाज पठान )

लोह्यातील बैल बाजार मराठवाडयामधील प्रसिध्‍द जनावरांच्‍या बाजारापैकी एक आहे. परंतु लॉकडाऊन नंतर या बाजारात जनावरांच्‍या खरेदी विक्री साठी देण्‍यात येणा-या दाखल्‍यासाठी मनमानी रक्‍कम ठेकेदाराकडून वसूल केली जात आहे. जनावरांचा दाखला, धक्का, दैनंदिन तय बाजार, यासाठी लुट सुरु आहे. ती थांबवा अन्‍यथा आंदोलन करु असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष वसंतराव पवार कॉग्रेस पदाधिका-यांनी दिला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्‍या वतीने मुख्‍याधिकारी लोहा यांना दुस-यांदा निवेदन देण्‍यात आले आहे. या आठवडी बजार, जनावरांच्‍या दाखला, धक्‍का तय बाजार व दैनंदिनी बाजार करणा-याकडून अतिरिक्‍त दराने वसुली केली जात आहे. फेरीवाले , भाजीपाला वाले, हातगाडेवाले यांना लुटले जात आहे. यापुर्वी आपणास निवेदन दिले परंतु आपण कोणतेही कार्यवाही केली नाही.

नगरपालिकेनी कंत्राटदार नेमलेत की, लुटारु असा सवाल पशु पालक, हातगाडेवाले भाजीपाला विक्रेते करीत आहेत. याचा फटका माझ्या सारख्‍या नाही बसला आहे. प्रसिध्‍द बाजार या वसुलीमुळे बंद पडू शकतो ही नगर पालिकेची बदनामी होत आहे. ही तात्‍काळ थांबवावी व जादा दराने मनमानी करणा-या कंत्राटदारावर कार्यवाही करावी अन्‍यथा अंदोलन करु असे लेखी निवेदन कॉंग्रेस शहर अध्‍यक्ष वसंत पवार यांनी केली आहे. या निवेदनावर माजी उपनगराध्‍यक्ष सोनू संगेवार,नगरसेवक पंचशिल कांबळे,पांडूरंग दाढेल,माजी बांधकाम सभापती पंकज परिहर,शरफोद्दीन शेख,अनिल दाढेल,शहर युवक अध्‍यक्ष पांडूरंग शेटे,शिवाजी मुंडे,भुषण दमकोंडावार,व्‍यंकटेश पाटील,बाबासाहेब बाबर यांच्‍या सह्या आहेत.

ताज्या बातम्या