लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर खड्यासह धुळीचे साम्राज्य; वाहनधारकासह नागरिक त्रस्त !

—————————————-
विशेष प्रतिनिधी /रियाज पठान

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 लोहा शहरामध्ये जीवघेण्या खड्ड्यांची मालिका सुरू असून अनेक निष्पापाला आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. अनेक पादचारी, दुचाकी-चारचाकी धारक आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत आहेत.एवढी दयनीय अवस्था या राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या चाळणी मुळे “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा”असे म्हणण्याची वेळ आली आहे.पूर्वी लोहा शहरातील खड्डे मुरूम टाकून बुजवण्यात आले होते आता मात्र धुळीने पूर्ण शहर माखले असून त्याचा त्रास देखील नागरिकांसह वाहन धारकांना होत आहे.

 

 

2021 मध्ये तरी लोहावासीयांची ही बिकट अवस्था संपेल असे वाटले, परंतु याकडे मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी जीव ओतून गुंतलेत असे चित्र दिसून येत नाही.लोहा नांदेड राष्ट्रीय मार्गावरील खड्डे बुजवले जात असले तरी लोहा शहरातील खड्याकडे व प्रचंड वाढलेल्या धुळीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रवास करताना वाहन चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे, व्यापारी वर्ग तर धुळीच्या साम्राज्याने पुरता त्रस्त झाला आहे.लोहा शहरातील शॉपिंग, दुकाने, मॉल्स, प्रतिष्ठाने,गर्दी बरोबरच धुळीने माखलेली दिसून येत आहेत. लोहा शहरातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे बारा वाजले आहेत.

 

 

अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी आंदोलने केली त्यात वंचित बहुजन आघाडीचे फुल बरसावो आंदोलन असेल संभाजी ब्रिगेडचे आंदोलन असेल धर्मवीर शेतकरी संघटनेचे आंदोलन असे अनेक पक्ष संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने केली परंतु त्याचा परिणाम कुठेच दिसून आलेला नाही.डागडुजीही नावापुरतीच दिसून येत आहे.

ताज्या बातम्या