लोह्याच्या सेवा सोसायटी वर शिवसेनेचे ज्येष्ट नेते, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे वर्चस्व

चेअरमन पदी गोविंद चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी पदी रामकिसन पारेकर बिनविरोध
—————————————-
विशेष प्रतिनिधी /रियाज पठान

संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व अत्यंत प्रतिष्ठेच्या लोहा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे वर्चस्व स्थापित झाले असून सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी गोविंद चव्हाण तर व्हाईस चेअरमन पदी रामकिसन पारेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज दिनांक ७ -१०- २०२० रोजी लोहा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा संपन्न झाली.यात 2020 ते 2025 या कालावधीसाठी संचालक मंडळातून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवडणूक घेण्यात आली सदरील निवडणूक बिनविरोधपणे पार पडली यात शिवसेनेचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे पुतणे गोविंद चंदरराव चव्हाण (नाना ) यांचा एकमेव अर्ज चेअरमन पदासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आला होता.तर व्हॉइस चेअरमन पदासाठी ही माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्ती व जेष्ठ सहकारी रामकिसन पारेकर यांचा एकच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आला होता. तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी
जी .आर. कौरवार यांनी लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माधव चव्हाण तर व्हाईस चेअरमन पदी रामकिसन पारेकर यांची बिनविरोधपणे निवड जाहीर केली.
यावेळी सेवा सोसायटीचे संचालक नागनाथ चुडावकर , चंद्रकांत कळकेकर, गोविंद चव्हाण, गोविंद डिकळे ,हरी शिंदे , संभाजी चव्हाण , नंदकुमार कहाळेकर, किशन शिंदे, मोहन वाघमारे, सौ.राधाबाई दामोदर चव्हाण ,सौ. विजया मोहनराव पवार, शामराव केदार, रामकिशन पारेकर ,सर्वच संचालक उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जी.आर.कौरवार, यांनी काम पाहिले.तर सहाय्यक म्हणून बी.बी. बोधगिरे ,ए.एस. चव्हाण यांनी काम पाहिले.
लोहा येथील येथीन सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन गोविंद उर्फ नाना चव्हाण व व्हाईस चेअरमन रामकिसन पारेकर यांच्या निवडीचे स्वागत शिवसेनेचे माजी आमदार रोहिदास चव्हाण, सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी .आर .कौरवार , बी.बी.बोधगिरे ,ए.एस. चव्हाण , यांनी केले.

# माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व सोसायटीचे हीत जोपासले जाईल – नवनिर्वाचित चेअरमन गोविंद चव्हाण व व्हाईस चेअरमन रामकिसन पारेकर #
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रतिष्ठेची समजली जाणारी लोहा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गोविंद चव्हाण व व्हाईस चेअरमन पदी रामकिसन पारेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया –
आमचे नेते शिवसेनेचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी आमची निवड केलीआहे. तेव्हा त्यांच्या विश्वासास आम्ही तडा न जाऊ देता सोसायटीचे,शेतकऱ्याचे हीत आम्ही जोपासू, गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आमचे नेते शिवसेनेचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण यांच्या ताब्यात लोहा येथील सेवा सहकारी सोसायटी असून त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज त्यांनी आमच्यावर जो विश्वास व्यक्त करीत आम्हा दोघांना चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड करून काम करण्याची संधी दिली आहे. त्या संधीचे आम्ही सोने करू.आमचे नेते रोहिदासजी चव्हाण यांनी नेहमीच शेतकरी ,कष्टकरी, कामगार व तसेच आमच्या संस्थेचेही हीत जोपासले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तम रित्या लोहा येथील सेवा सोसायटीचा कारभार पाहूत व सेवा सहकारी सोसायटीला भरभराटीत आणण्याचा प्रयत्न करू.

ताज्या बातम्या