लोहा तहसिलदार राम बोरगांवकर यांना महाराष्ट्र विकास आघाडी नांदेड च्या वतीने निवेदन.

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात सहीत महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आहे. सोयाबीन, मूग ,उडीद ,हळद,ऊस यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल आहे.

तरी माननीय तहसीलदार साहेबांनी पंचनामे करून सरसगट नुकसान भरपाई जाहीर करावी असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. संपूर्ण नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी व ऑनलाइन प्रक्रिया न करता पिक विमा मंजूर करून शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करण्यात यावे असे निवेदन तहसिलदार राम बोरगांवकर साहेब लोहा यांना देण्यात आले .
यावेळी उपस्थित महाराष्ट्र विकास आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष शुभम सावकार उत्तरवार, दक्षिण जिल्हा अध्यक्ष मारोती राठोड, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कमलापुरे, कैलास सूरनर व आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या