“लोक आंदोलन” न्यास जिल्हा उपाध्यक्षपदी रामप्रसाद चन्नावार यांची निवड.!

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित “लोक आंदोलन” न्यास राळेगणसिद्धी या संघटनेच्या अधीन राहून नांदेड जिल्ह्यातील तालुका गाव गण गट व शहर वार्ड येथील महिला आघाडी युवक आघाडी ज्येष्ठ आघाडी यांची प्रत्येकी अकरा लोकांची समिती गठीत करण्यासाठी या संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांची नियुक्ती संघटनेच्या वरिष्ठांनी करून नियुक्तीपत्र दिली आहे. 
  रामप्रसाद विठ्ठलराव चन्नावार हे नायगाव शहरातील रहिवाशी असून गेल्या अनेक अण्णा हजारे यांच्या संघटने मध्ये हिरारीने भाग घेऊन संघटन बांधणीचे काम ते सतत करतात तसेच बरेच वर्षापासून ते पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत तर सामाजिक संघटनेतेही सक्रिय भाग घेऊन कार्यकर्त्याची जुळवा जुवळ करत संकटात्मक बांधणीचे काम ते सतत करत असतात व करित असल्यामुळे त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन पद्मविभूषण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या “लोक आंदोलन न्यास” राळेगणसिद्धी या संघटनेत नांदेड जिल्ह्याच्या “उपाध्यक्षपदी” सदर संघटनेचे काम वाढविण्यासाठी न्यासचे विश्वस्त डॉ.बालाजीराव कोंपलवार. कार्यकारी अध्यक्षा श्रीमती कल्पना इनामदार. सचिव अशोक सब्बन. इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष इंजी.चंद्रशेखर एस अय्यर व कार्यकारी अध्यक्ष भागवत पप्पुलवाड यांनी रामप्रसाद चन्नावार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून निवडीचे नियुक्तीपत्रही त्यांना दिले याबाबत रामप्रसाद चन्नावार यांची सर्व मित्र परिवार व मराठी पत्रकार संघ तालुका नायगाव.पद्मशाली समाज संघटना तालुका नायगाव ईत्यादीनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या