लोककला मराठी शाहिर परिषद महाड, रायगड ची जनरल सभा आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा ! 

[ रायगड प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे ]
कुणबी समाज भवन महाड येथे लोककला मराठी शाहिर परिषद महाड रायगड या रजि. जनरल सभा आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा अतिशय आनंदी वातावरणात संपन झाला सदर सभेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. उमाजी. सी म्हस्के आणि अन्य स्वर्गीय कलावंताना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात झाली विद्द्यमान अध्यक्ष संदीपज़ी म्हस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले या सन्मान सोहळ्यास कोकणातील प्रसिद्ध असलेली कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ रायगड, रत्नागिरी यांचे श्री रामभाऊ टेंबे यांची रायगड जिल्हा वृद्धकालावंत मानधन समितीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली तर, संघटनेचे श्री शंकर फणसे यांची ही रायगड जिल्हा मानधन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने सत्कारमूर्ति म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

सदर सभेस दि.म्हसळा टाईम्सचे अध्यक्ष रायगड भूषण शाहिर रामचंद्र म्हात्रे यांचा ही सत्कार करण्यात आला. श्री रामभाऊ टेंबे, शाहिर रामचंद्र म्हात्रे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उत्तम प्रकारे उपस्थित सभेस मार्गदर्शन केले या सभेस संस्थाहितचिंतक मा. श्री मन्सूरभाई देशमुख, पांडुरंग पवार, सुदाम कंक, सहदेव उतेकर, दत्ता सुतार, शंकर तुरडे, दामू बटवले मान्यवर उपस्थित होते सभासूत्र संचालन श्री. सहदेव उतेकर यांनी केले तर मा.अध्यक्ष संदीप म्हस्के यांनी उपस्थित सभेचे आभार मानुन सभा संपन्न झाली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या