लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या चरित्रग्रंथ निर्मितीस शंकर भंडारे तर्फे बार्टीला साहित्यिक ठेवा सुपूर्द 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रग्रंथ निर्मितीसाठी संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि साहित्य समाजाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचावे; हा मुख्य उद्देश असल्याचे बार्टीने जाहीर केले होते. 
 – या मुख्य उद्देशानुसार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात विविध भाषेतील दुर्मिळ कागदपत्रे, दस्तऐवज, पुस्तके, साहित्य, तत्कालीन वर्तमानपत्रातील कात्रणे, तत्कालीन पत्रव्यवहार, जुनी छायाचित्रे किंवा विद्यापीठातील संशोधक अभ्यासक यांचे एम.फिल, पीएचडीचे शोधप्रबंध इत्यादी माहिती कोणाकडे उपलब्ध असल्यास बार्टीकडे पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले होते. 
बार्टीने केलेल्या आवाहनानुसार थडीसावळी येथील रहिवासी सध्या नांदेड येथील गांधीनगर मध्ये वास्तव्यास असलेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथील निवृत्त केंद्रप्रमुख मान. शंकर बाळू भंडारे यांनी त्यांच्या जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीची पुस्तके, लेख, तत्कालीन वर्तमानपत्रांचे कात्रण, मासिकातील लेख व दुर्मिळ फोटोंचा असलेला संग्रहित ठेवा त्यांनी व्यक्तिशः पुणे येथे जाऊन बार्टीच्या संशोधन विभागास सुपूर्द केले होते. निवृत्त केंद्रप्रमुख शंकर भंडारे १९७५ पासून समाजाच्या विकासासाठी अग्रेसर आहेत. समाजाचे मेळावे, जयंत्या व समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत सन्मानपत्र, गुरूगौरव , समाजभूषण पुरस्कारांनी विविध ठिकाणी सन्मानित केले आहे.
त्यांना अण्णाभाऊंचे साहित्य संग्रहित करण्यासाठी डाँ. गोपाळराव गायकवाड, गोरोबा पवार, नरसिंग सूर्यवंशी, गोटमुकले गुरुजी, जयरामजी भंडारे यांचे मार्गदर्शन लाभले होते. लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक ठेवा बार्टीकडे देऊन प्रतिसाद दिल्याबद्दल बार्टीचे संचालक मान. सुनील वारे साहेब आणि विभाग प्रमुख वृषाली शिंदे व डॉ. बिरांजे यांनी पत्राद्वारे शंकर भंडारे यांचे आभार मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या