भगवान बालाजीच्या वाहनाची भव्य मिरवणूक सोहळा थाटात संपन्न

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूच्या सिमेलगत असलेल्या नरसी फाटा येथे तिरुमला तिरुपती स्वरूप समजले जाणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, नवसाला पावणाऱ्या भगवान बालाजी मंदिराच्या वतीने, भाविक भक्तांनी दिलेल्या देणगीतून बालाजीला प्रिय असलेल्या वाहनाची भव्य दिव्य मिरवणूक नायगाव ते नरसी पर्यंत थाटात संपन्न झाली.

तालुक्यातील नरसी येथील प्रसिद्ध असलेले श्रीमंत भगवान बालाजीचे आवडते वाहन असलेल्या आठ वाहने हानुमान, गरूड, शेष , अश्व, गज, हंस, सुर्यप्रभा, कल्पवृक्ष आदी वाहनाची भव्य मिरवणूक नायगाव येथील हानुमान मंदिरापासून सुरूवात झाली.
नायगाव नगरप्रदक्षिणा पुर्ण करुन हि मिरवणूक नरसी कडे प्रस्थान झाली. भगवान बालाजी मिरवणूकीत हाजारो भाविक सहभागी झाले होते. जागोजागी चाह, फराळ,पाणी, प्रसाद नायगाव येथील भाविक भक्ताकडून करण्यात आली. मिरवणूकीत भजनी, ढोल ताशा पथक, आतिश बाजी यामुळे मिरवणूकचे आकर्षण वाढले. नरसी गाव परिसरात गोविंद, गोविंद व्यंकट रामन गोविंदा जय घोष करत भाविकांनी कुठे फुगडी तर कुठे रिंगण, करून आनंद घेत महिला भाविकांनी पाऊल टाकले.
या कार्यक्रमाची सांगता श्रीमंत भगवान बालाजी मंदिरात महाआरतीने झाली व आरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. कै उद्धवराव सावकार मेडेवार यांच्या संकल्पनेतून श्रीमंत भगवान बालाजी मंदिरांची स्थापना केली गेली. या या मिरवणुकीची सुरुवात नायगाव येथील हनुमान मंदिरात हनुमंतराव पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, संजय आप्पा बेळगे, भगवानराव लंगडापुरे, श्रीराम सावकार मेडेवार यांच्या हस्ते आर्य वैश्य समाज बांधव व भाविकांच्या उपस्थितीत नारळ फोडून भगवान बालाजी वाहनाची मिरवणूक काढण्यात आली. तर मिरवणुकीची सांगता भगवान बालाजी मंदिर नरसी येथे करण्यात आली.
भव्य दिव्य वाहनाची मिरवणूक भक्तीमय आनंद उत्सवात मंदिर समितीचे अध्यक्ष हानमंतराव पाटील चव्हाण, उपाध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे, पुनमताई राजेश पवार, श्री राम मेडेवार, बाबुराव शक्करवार, वसंत सावकार मेडेवार, विनोद बच्चेवार, विजय पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, लक्ष्मण ठक्करवाड, भास्कर पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे, अनिल श्रीरामवार, नारायण देशटवाड, पवन गादेवार, गजानन चौधरी यांच्या सह परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या