गंगनबीड महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
शिखर शिंगणापूर प्रतिस्वरुप समजले जाणाऱ्या शिवपार्वती एकत्र असलेल्या गंगनबीड महादेव मंदिरात भाविकांचे दर्शनासाठी अलोट गर्दी नांदेड ते नरसी महामार्गावर असलेल्या कुंटूर फाट्यापासून पश्चिम दिशेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पहाडावर वसलेल्या नवसाला पावणाऱ्या स्वयंभू गंगणबीड महादेवास पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी रात्रीपासूनच पाई रांगा लावल्या होत्या मंदिर प्रशासनाच्या वतीने सुलभ दर्शनासाठी कसल्याच प्रकारचे सोय न केल्यामुळे भाविकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

गंगनबीड महादेव नागमोडी रस्त्याच्या पहाडावर बसलेले असल्यामुळे या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात झाल्याने भाविक भक्तांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती निवडणुकीच्या काळात प्रत्येक लोकप्रतिनिधी आपण निवडून यावे म्हणून महादेव मंदिरात येऊन प्रचाराचा नारळ फोडून यश प्राप्त करीत असतात परंतु निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे मंदिराकडे जाणाऱ्या खड्ड्याच्या रस्त्याकडे व नागमोडी रस्त्यावर वळणावर बॅरिकेट न लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोटरसायक घसरून अपघात होत आहे. 
याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येणाऱ्या श्रावण सोमवारी भविष्यात कसल्याच प्रकारचा अपघात घडू नये म्हणून या रस्त्याची डाग दुगी करण्यात यावी तसेच गंगनबीड महादेव मंदिर तीर्थक्षेत्र घोषित करून जास्तीत जास्त नेते लोकप्रतिनिधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाविक भक्तातून होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या