कुंटुर परिसरात जोरदार संततधार पावसामुळे पुरामुळे 1270 हेक्टर जमीन मधील पीक गेले पाण्याखाली !

● शेळगाव छत्री, कोकलेगाव,कुंटुर गावात पाणी !
● पुरात वाहून गेलेल्यांना शेतकऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करु वाचविण्यात यश !
[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात जोरदार पाऊस होऊन कुंटुरच्या भोवताल पाणीच पाणी झाले आहे. कुंटुर, कोकलेगाव, शेळगाव छत्री, सुजलेगाव, कोठाळा, औराळा, मेळगाव, या गावात सर्वत्र पाऊसाची संततधार सुरू आहे.

शेतामध्ये, रस्त्यावर, तर काही गावांमध्ये पवसाचे पाणी शिरलं आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे सोयाबीन, कापुस, तुर, ज्वारी, पीके पाण्याखाली गेली आहेत.
शेतक-यांची पुन्हा चिंता वाढली आहे. पाऊस असाच स़ंततधार पडत राहिल्यास पुर्ण शेती खरडुन, पीके खराब होतील असे शेतकरी सांगत आहेत.

सर्व नदि, नाले, ओढे, रस्ते पाणी साचुन डबके तयार झाले आहेत. 1270 हेक्टर शेतजमीनीतील पीके पाण्याखाली गेले आहे. कुंटुर च्या भोवताल पाणीच पाणी झाल्याने कुंटुर चा संपर्क बंद झाला आहे.कुंटुर ला जोडणा-या चारही रस्त्यावर पुरामुळे पाणीच पाणी झाल्याने रस्ते बंद झाले होते.
रात्रभर पासुनच पाऊस सुरू होता. सकाळी कुंटुर येथील शेतकरी आपल्या शेतात गुरें ढोरं पाहण्यासाठी पुलावरून पाण्यातून जात असताना अचानक पावसाच्या जोरदार आगमनामुळे दोन शेतकरी वाहुन गेले होते. एक पोहत कसा बसा बाहेर आला तर एक शेतकरी पुरात वाहून झाडांवर चढून बसला होता.

सकाळी 08:50 वाजता पासुन सायंकाळी 05:00 वाजतापर्यंत त्या शेतकऱ्यांना काढण्यासाठी तलाठी काळे कुंटुर, पोलीस निरीक्षक महादेव पुरी प्रयत्न करत होते.तहसीलदार व सर्व अधिकारी शेतकऱ्यांना काढण्यासाठी प्रयत्न करत होते.
या कामी सातेगाव येथील पोहणारा व्यक्ती नागोराव हुलाजी पामलवाड यांनी पुरात धाव घेवुन तापाचा सहाय्याने झुंजारे भिवा संभाजी यास वाचविले.
यावेळी तहसीलदार गंजानन शिंदे,आमदार राजेश पवार,पुनम पवार, राजेश कुंटुरकर, शिवाजी पा.होळकर, कुंटुर येथील पत्रकार बालाजी हनमंते, अनिल कांबळे कुंटुरकर, सुनिल पा.होळकर व मोठ्या संख्येने नागरिक पाहण्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा जिव वाचवना-या नागोराव पामलवाड याला आमदार राजेश पवार यांनी 2 हजार रुपये बक्षिस देवुन आभार मानले.
कुंटुर येथील संपूर्ण गावाक-यांकडून आमदार राजेश पवार, सौ. पूनमताई पवार, राजेश कुंटूरकर, तहसीलदार शिंदे, API महादेव पुरी, तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन या सर्वांचे मनापासून आभार मानन्यात आले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या