गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेळगाव छत्री येथील शेतकऱ्यांची मागणी !

राजकीय नेत्यांनी आपली सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी वाटेल त्या थराला जात असताना दिसुन येते पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडातील भाकर हिरावली गेली, शेतकरी वर्गावर निसर्गाने दुहेरी संकट निर्माण केले असल्याने त्यांना सावरण्यासाठी शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काही वेळातच शेळगाव छत्री शिवारातील अगदी तोंडावर आलेल्या टाळकी ज्वारी, गहू, टमाटा, तीळ व अन्य पिकावर तुफान वारा व पाऊस आणि गाराने झोडपले असल्याने अतोनात शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे तेव्हा शासनाने नुकसान झालेल्या पिकाची त्वरीत पाहणी व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेळगाव छत्री येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

रब्बी हंगामातील पिकाची काढणी वेगाने चालू होती तर काही शेतकऱ्यांनी दुबारा पेरणी केली असल्याने ती हिरवीगार पिके शेतात उभी होती. दिनांक 16 मार्च रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली यात प्रचंड झालेल्या गारा वारा व पावसामुळे शेळगाव छत्री येथील शेतकरी प्रल्हाद देवराव पेदे यांच्या शेतातील टाळकी ज्वारी टमाटा तीळ या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे तर बालाजी मोहन सालेगाये, केरबा भीमराव सालेगाये, दिगंबर नारायण सालेगाये, बालाजी विठ्ठल सालेगाये,मारुती गुरप्पा पांडे,उत्तम किशन सालेगाये, दिगंबर महाजन करखेले, संजय बालाजी चोंडे, गोविंद हावगीर पांडे, बबलू रमेश चोंडे यांच्याही शेतातील टाळकी ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे यासोबत शेळगाव छत्री येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आणि विशेष म्हणजे जनावरासाठी लागणारे वैरण कडब्याचे देखील नुकसान पोहोचले आहे, शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून सोन्यासारखे पिकवलेली भारदार पिकाचे अवकाळी पाऊस गारा वारा यामुळे शेतातील हिरवीगार पिके आडवी झाली तेव्हा शासनाने त्वरित प्रशासनाला आदेशित करून शेतकऱ्यांच्या पिकाची पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेळगाव छत्री येथील शेतकरी वर्गाने केलेली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या