मौजे गंजगाव येथे दलित वस्तीत फेवर ब्लाॕक रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील गंजगाव ग्रामपंचायत हद्दीत कंत्राटदारामार्फत नरेगा अंतर्गत अंदाजे 20 लक्ष रुपये निधीतून दलित वस्ती मध्ये फेवर ब्लाॕक चे रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे गंजगाव ग्रामपंचायत निगराणीत हे कामे होत असून ग्रामपंचायत विरुद्ध रोष जनतेतुन व्यक्त होत आहे मेन रोड ते खंडु गायकवाड यांच्या घरापासुन मेन रोड माधवराव घाटे यांच्या घरा पर्यत दलित वस्ती मध्ये फेवर ब्लाॕक चे रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.
हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर अभियंता हजर राहात नसल्याने कंत्राटदार मनमर्जी काम करीत आहे. या रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तसेच अत्यल्प सिमेंट वापरले जात असल्याने कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.
 हा रस्ता काळ्या मातीच्या जमिनीवर असून बांधकामात जाडा गिट्टा असणे आवश्यक असूनही त्याचा उपयोग करण्यात येत नाही आहे. जाडा गिट्टा नसल्याने या बेडला व रस्त्याला तडा पडून तो तुटणार हे निश्चित आल्याचे गावकरी म्हणत आहेत फेवर ब्लाॕक बसवण्या पुर्वी त्यांचा खाली चार इंचाचा बेड येणे अपेक्षित होते पण भ्रष्टाचारी यंञणा यांच्या मुळे अंदाजपत्रका प्रमाणे कामे होत नसल्याने जनतेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या वर जनतेचा खुप रोष आहे वरिष्ठ अधिकार्‍यांनीच लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.हा फेवर ब्लाॕक रस्ता बांधकाम कंत्राटदार मनमर्जीने करीत असल्याचा प्रकार प्रत्यक्ष दिसून आला.
या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाच्या ‘डस्ट’चा उपयोग करण्यात येत आहे गंजगावला मांजरा नदी लाभली आसुन ग्रामसेवकांनी रेती न आनता निकृष्ट दर्जाचा डस्ट आनत आहेत अंदाजपत्रका प्रमाणे बेड चार इंच आसायला हवा होता पण अभियंता मेडेवार यांच्या अशिर्वादाने एक ते दिड इंच बेड घेण्यात आला वावरच कुंपण खाते अशी आवस्था गंजगाव येथिल दलित वस्तीतील नागरिकांची झाली आहे या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन चौकशी झाली पाहिजे आसे ग्रामस्थाचे म्हणे आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या