माधव पटने यांची बिलोली तालुका जनता दल सेक्युलर च्या अध्यक्षपदी निवड !

[ विशेष प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
जनता दलच्या आज झालेल्या बैठकीत प्रदेश जनता दलाचे उपाध्यक्ष डॉ.पी.डी. जोशी पाटोदेकर व प्रधान महासचिव सुर्यकांत वाणी हे होते. माधव लालप्पा पटने यांची पक्षनिष्ठा पाहून त्याची एकमताने जनता दल सेक्युलर बिलोली तालुका अध्यक्ष पदी निवड केली असून या बैठकीतच निवडीचे पत्र जिल्हा प्रधान महासचिव सुर्यकांत वाणी यांच्या हस्ते देवुन त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार केला.
माजी आमदार गंगाधर पटने, व जिल्हा अध्यक्ष माजी खासदार डॉ.व्यकंटेश काब्दे, नांदेड तालुका जनता दल सेक्युलर चे अध्यक्ष प्रा.डॉ. लक्ष्मण शिंदे, अर्चना पाडळकर, बालाजी आले व मारोती सुर्यवंशी प्रशांत गजभारे यांच्यासह अनेक जनता दल सेक्युलर कार्यक्रर्ते तालुका अध्यक्ष पदी निवडी बद्दल माधव पटने यांना अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या