माधवराव कंधारे यांची ओबीसी यांच्या काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्ह्याचे माजी खासदार व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी माधवराव कंधारे यांची ओबीसी सेलच्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीचे नियुक्ती पत्र प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार राजेंद्र नगर नांदेड येथील निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली माधवराव पाटील कंधारे यांची ओबीसी सेलच्या काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
       यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, वरीष्ठ काॅंग्रेस कमीटीच्या उपाध्यक्षा डॉ.मिनलताई खतगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, ओ.बी.से.सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, मागासर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मनोहरराव पवार,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुला, सेवादल जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, NSUI चे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, प्रवक्ते बालाजी गाढे, माजी उपमहापौर सरजीतसिंग गील, बिलोली तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, मंगल देशाई सह आदींची उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या