गंगनबीड येथे शुक्रवार पासून श्री.क्षेत्र महादेव मंदिर देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शिंगणापूर प्रतिरूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या पुरातन कालीन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री.क्षेत्र महादेव मंदिर गंगनबीड येथे महाशिवरात्री महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह दि.२१ फेब्रुवारी रोज शुक्रवार या दिवशी सुरुवात होणार अशी माहिती महादेव मंदिर ट्रस्ट समिती गंगनबिड यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार येणार आहेत. सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.दि.२१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री. वासुदेव महाराज कोलंबिकर यांचे कीर्तन होईल, दि.२२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री. मधुसूदन महाराज कापशीकर यांचे कीर्तन होईल, दि.२३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री. चंद्रकांत महाराज लाटकर (उस्माननगरकर) यांचे कीर्तन होईल दि‌.२४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री. राधेश्याम महाराज खरबळ वेलतुरा हिंगोली यांचे कीर्तन होईल, दि.२५ फेब्रुवारी रोजी ह.म.प.श्री. रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांचे कीर्तन होईल, दि.२६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री. विश्वनाथ महाराज काकांडी कर यांचे कीर्तन होईल, दि.२७ फेब्रुवारी रोज गुरुवार दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत महाप्रसाद भंडारा होईल आणि रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री. सचिन महाराज ढोले छत्रपती संभाजीनगर यांचे कीर्तन होईल दि‌.२८ फेब्रुवारी रोजी शेवटचे काल्याचे किर्तन ह.भ.प.श्री. शिवानंद महाराज शास्त्री पैठण यांच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल.
तरी या सप्ताह कार्यक्रमास नायगाव तालुक्यातील व गंगनबीड पंचक्रोशीतील भाविक भक्त, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कीर्तन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व श्री.क्षेत्र महादेव मंदिर ट्रस्ट गंगनबीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या