महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
( कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते )
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह व बोधीसत्व बुध्द विहार कुंटूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रकाश सोनटक्के, गणेश कदम, प्रशांत हनमंते, दशरथ हणमंते, प्रशांत सर्जे, उपस्थित होते व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मीत्र मंडळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नाजी झुंजारे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा रविकांत हनमंते पत्रकार बालाजी हणमंते, संतोष हणमंते, दिलीप गजभारे हे उपस्थित होते.
रविकांत हणमंते सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवकार्याचा उलगडा केला,तसेच आजच्या काळात मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या वेळी साठे नगर सभागृहाच्या बाजूस प्रमुख पाहुणे तसेच सुरेश जलबा वाघमारे यांच्या हस्ते बोधि वृक्ष लाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत वाघमारे, दत्ता झुंजारे, अविनाश वाघमारे, लक्ष्मण जेथेवाड, रविकांत गायकवाड, संतोष झुंजारे, विजय झुंजारे, जीवन वाघमारे, रोहित वाघमारे, अमृत गायकवाड, अविनाश झुंजारे, प्रकाश पेठवडजकर, बाबुराव गायकवाड, सुधीर वाघमारे, सुनिल वाघमारे, उद्घव झुंजारे इ नवयुवक उपस्थित होते. विशाल हनमंते, विशाल कदम, प्रशिक हनमंते, पुर्वा बालाजी हनमंते, आरती हनमंते, पुजा हनमंते, कुणाला हनमंते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com