बिलोलीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
दि.६ डिसेंबर रोजी आंबेडकर नगर बिलोली येथील भिमजयंती मिञ मंडळ ने महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते कँडल पेटवून, पुष्प हार अर्पण करुन अभिवादन केले गेले.

 या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बिलोली ठाणे चे पोलिस निरिक्षक सोंडारे यांची उपस्थिती तर अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष मा.भिमराव जेठे हे उपस्थित होते. ज्ञानसुर्य महामानव, भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तथा भिमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्ञज्ञ, अर्थशास्ञज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते.

यांनी स्वताःचा व आपल्या परिवाराचा विचार न करता, त्यांनी जगातील जनतेचा विचार केला, आणि दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
त्यांचं जन्म १४ एप्रिल, १८९१ तर ६ डिसेंबर, १९५६ रोजी काळाच्या पडद्या आड झालेल्या या महामानवाची आठव उराशी बाळगून बिलोलीचे बौद्ध बांधव, महिला, व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्य डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले.
बौद्ध गुरु भंतेजी आंनदजी यांनी बौद्ध धम्मा बद्दल बौद्ध बांधवांना विचार प्रदान करुन अभिवादन केले. यावेळी पो.नि, सोंडारे, भिमराव जेठे, आमृतराव गौलवाड, एल.एस.जाधव, प्रकाश पोवाडे, शिवराज रायलवाड, भिमराव बडूरकर, भाजपा युवा ता.अध्यक्ष इंद्रजित तुडमे, कृ.उ.बा.स.हा.मा.संचालक बाबू कूडके, पि.आय गायकवाड, भिमराव लाखे, डाॕ.दिपक जाधव, संजय जाधव, काँग्रेस कार्यकर्ते मुन्ना पोवाडे, मा.सरपंच सय्याराम निदाने, गंगाधर कुडके, मोहसिन खाॕन, संदिप कटारे, शुभम जेठे, सय्यद रियाज, साईनाथ शिरोळे, सुनिल जेठे यांच्या आंबेडकर नगरातील महिला बचत गटाती पदाधिकारी सदस्या व आदी नागरिक, बालक उपस्थित होते.
तर या कार्यक्रमाचे आयोजन भिमजयंती मिञ मंडळ व सत्यजित जाधव यांनी केले होते. सुञसंचनल ते आभार धम्मपाल जाधव यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या