महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पंढरपूर येथे तीन आणि चार फेब्रुवारी रोजी तिसरे अधिवेशन !

“ना.सुधीर मनगुंटीवार, आ. समीर कुणावार, आर्य वैश्य महासभा अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार !”

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे अधिवेशन दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, निजामाबाद तेलंगण मतदार संघाचे आमदार धनपाल सूर्यनारायणा, आंध्र प्रदेश पर्यावरण व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गुब्बा चंद्रशेखर, काशी अन्नसत्रम समितीचे सदस्य बच्चू विलास यांच्यासह आर्य वैश्य समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातही प्रस्थापित झाली आहे. महासभेच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. पहिले अधिवेशन शिर्डी या ठिकाणी झाले आणि दुसरे अधिवेशन तिरुपती येथे भरविण्यात आले. दोन्ही अधिवेशनाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून आता तिसरे अधिवेशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिनांक तीन व चार फेब्रुवारी 2024 रोजी भरविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे जिल्हा कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशा सर्व जिल्हा कार्यकारी मंडळ, महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभेच्या सर्व जिल्हा कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची या अधिवेशनासाठी उपस्थिती राहणार आहे.
समाजाचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्र उन्नतीचे माध्यम आहे. या उद्देशाने समाज संघटन आणि बळकटी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आयोजन आहे. या ऐतिहासिक व समाजाच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या अधिवेशनात सर्व समाज बांधवांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. हे मात्र विशेष.
 दोन दिवसीय अधिवेशनासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदार सुधीर मुनगंटीवार, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार समीर कुणावार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून निजामाबादचे आमदार धनपाल सूर्यनारायणा, गुब्बा चंद्रशेखर, विलास बच्चू, तिरूमला देवस्थानच्या माजी विश्वस्त सपनाताई मुनगंटीवार, अखिल भारतीय आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरीताई कोले, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अमरावतीचे माजी आयुक्त प्रवीण आष्टीकर, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, महासभेच्या महिला अध्यक्षा सुलभाताई वट्टमवार, सचिव शिल्पाताई पारसवार, कोषाध्यक्षा राजश्री पारसवार यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा राज्य कार्यकारिणी, बांधकाम समिती, सर्व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच सर्व महिला जिल्हाध्यक्षा व महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. या महासभेच्या अधिवेशनासाठी आर्य वैश्य समाजातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांनी केले आहे.
दिनांक तीन आणि चार फेब्रुवारी रोजी दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिवेशन भरविण्यात येणार आहे. श्री यश पॅलेस, कराड रोड, पंथ नगरी शेजारी पंढरपूर येथे हे अधिवेशन भरविण्यात येणार आहे.
दोन दिवसीय अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून जवळपास एक ते दीड हजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्याने त्याची जय्यत तयारी महासभेच्या वतीने सोलापूर जिल्ह्य़ातील व पंढरपूर येथील महासभेचे पदाधिकारी संजय कौलवार, अविनाश नलबिलवार, डॉ. सचिन लादे, राजेंद्र वट्टमवार, सुलभाताई वट्टमवार यांच्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील महासभेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या