महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सर्वसाधारण सभा व कार्यकारी मंडळ निवड !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सर्वसाधारण सभा व कार्यकारी मंडळाची निवड प्रमुख सभासदांच्या उपस्थितीत होणार असून सर्व सभासदाने उपस्थित राहावे असे आव्हान आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आले आहे, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सर्वसाधारण सभा दिनांक 25 जानेवारी 2025 रोज रविवार रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली असून या सभेच्या अध्यक्षस्थानी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार हे राहणार आहेत.
सर्वसाधारण सभेचे विषय 2025 ते 28 या कालावधीसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची नवीन कार्यकारणी मंडळाची निवड करणे, सर्व सभासदांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित राहावे, याबाबत विशेष सूचना अशी की, कोरम आभावी सभा तहकुब झाल्यास एक तासानंतर याच ठिकाणी सर्वसाधारण सभा घेण्यात येईल, त्यास कोरमची आवश्यकता असणार नाही, निवडणूक संदर्भातील कार्यवाही पार पाडण्यासाठी एडवोकेट गुणवंत बापूराव देवकते यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, सर्वसाधारण सभेत ओळखपत्र फोटो आय.डी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
दिनांक 5 जानेवारी 2024 च्या पूर्वी सभासद हे निवडणुकीत व मतदानास पात्र आहेत अशा सभासदांनाच सदर सर्वसाधारण सभेत उपस्थित राहता येईल, पात्र सभासदांची यादी महासभेचे मुख्य कार्यालय नांदेड येथे पाहावयास मिळेल याची नोंद सर्व महासभेच्या सदस्यांनी घ्यावी असे आव्हान महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंद लक्ष्मणराव बिडवई यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या