महाराष्ट्र आर्य वैश्य युवा महासभेच्या नायगाव शाखेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाळेकर उपाध्यक्षपदी ऋषिकेश उपलचवार, सचिवपदी अविनाश चालिकवार यांची निवड !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य युवा महासभेच्या नायगाव शाखेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाळेकर उपाध्यक्षपदी ऋषिकेश उपलांचवार ,सचिव पदीअविनाश चालिकवार यांची निवड झाल्याने सर्वत्र स्वागत होत आहे नायगाव येथील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने महत्वाची बैठक अध्यक्ष सतीश मेडेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आर्य वैश्य युवा संघटनेच्या नायगाव शाखेच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते निवडणूक पद्धतीने करण्यात आली.

यावेळी नायगाव शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, उपाध्यक्ष ऋषिकेश उपलांचवार तर सचिवपदी अविनाश चालीकवार यांची निवड करण्यात आले निवडीचे स्वागत अतिश बाजीत पेढे वाटून स्वागत करण्यात आले निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान माजी अध्यक्ष विनोद सावकार गंदेवार व अध्यक्ष सतीश मेडेवार उपाध्यक्ष गजानन चौधरी, सचिव कपिलेश्वर नरबलवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कवटीकवार , सतीश लोकमनवार, साईनाथ मेडेवार, चंद्रकांत बच्चेवार, धनंजय कवटीकवार, साईनाथ मेडेवार पवन गादेवार कैलास कवटीकवार, आशिष मामीडवार, नरेश गंदेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव येथील आर्य वैश्य युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
www.massmaharashtra.com