महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची सर्वसाधारण सभा १ जून रोजी !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक एक जून रोजी दुपारी दोन वाजता महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन नांदेड सिडको भागातील वासवी भवन येथे होणार आहे.
मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित श्री वासवी माता चारिटेबल हॉस्पिटल नांदेड बाह्य रुग्ण विभागास (ओपीडी) मंजुरी देऊन या हॉस्पिटल साठी दर महिन्याला येणाऱ्या खर्चाला मान्यता देणे, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या आयोजित श्री वासवी माता चारिटेबल हॉस्पिटल नांदेडचा उद्घाटन सोहळा दिनांक एक जून रोजी सकाळी 10 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महासभेच्या वतीने निवड करण्यात आलेल्या नवीन युवा महासभा कार्यकारणीस मंजुरी देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंद पत्रकास मान्यता देणे तसेच पाच सप्टेंबर 2024 रोजी महासभेच्या राज्य कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नवीन कार्यकारणीच्या निवडी बाबत चर्चा करून निवडीची तारीख ठरविण्याचा विषय चर्चिल्या जाणार आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या सर्वच उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून महासभेच्या वतीने बाह्य रुग्ण विभाग उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने दिनांक एक जून रोजी आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस राज्यातील सर्व महासभेचे राज्य जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार जिल्हा प्रसिद्ध प्रमुख गजानन चौधरी यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या