महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंद ला विरोध- गजानन चव्हाण नायगांवकर !

[ विशेष प्रतिनिधी : शिवानंद पांचाळ नायगांवकर ]
लखीमपुर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, काँग्रेस, आणि शिवसेनेच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याच्या टीकेला भाजपही सडेतोड उत्तर देत आहेत.
त्यातच महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा नायगांव बाजार येथील भाजपाचे युवा नेते गजानन चव्हाण यांनी विरोध केला आहे, लखीपुर ची घटना निषेधार्थ आहेच, परंतु आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून राजकीय भाकरी भाजायला उत्तर प्रदेश मधील घटनेवर महाराष्ट्र बंद म्हणून आम्ही महाभकास आघाडी सरकारचा ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदचा विरोध करतो.
लखीमपूर हिंसाचाराची घटना दुर्दैवीच, संदर्भात दोषींना शिक्षा व्हावी, महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार , छोटे-छोटे व्यवसायिक, रोज नवीन संकटांना सामोरे जात असताना महाभकास आघाडीने पुकारलेल्या बंदला विरोध करतो, असं म्हणत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी शहरातील भाजपाचे युवा नेते जिवनराव चव्हाण यांनी उपस्थित राहून महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध दर्शविला आहे.
गजानन चव्हाण पुढे म्हणाले की‌ या महाभकास आघाडीच्या शहरातील काही लोकांनी दडपशाही हुकुमशाही करत विनाकारण छोट्या छोट्या व्यवसायिकांना व्यापाऱ्यांना त्रास देऊन काही वेळ शहरातील दुकाने बाजार पेठ बंद केली होती, पण व्यापाऱ्यांची न घाबरता या महाराष्ट्र बंदला विरोध करत आपली दुकाने पूर्णपणे दिवसभर चालू ठेवले असल्याचे दिसून आले, महाराष्ट्र बंदला नायगांव शहरात विरोध करते वेळी, भाजपाचे गजानन चव्हाण, जीवन चव्हाण, सह सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर, व्यापारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते आदीं बहुसंख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या