महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना लाभार्थ्यांच्या अडचणी त्वरित दूर करा – प्रा.रवींद्र चव्हाण

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणी त्वरित दूर करा अशी मागणी प्रा रवींद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना भेटून केले गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव येथे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अडचणीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.योजनेच्या मस्टर मागणीवर ग्रामसेवक स्वाक्षरी करत नाहीत व ग्रामसेवकाची स्वाक्षरी असल्याशिवाय गटविकास अधिकारी मस्टर वितरित करण्याची परवानगी देत नाहीत.
त्यामुळे नायगाव तालुक्यातील सर्व सिंचन विहीर व जनावरांच्या गोठ्यांचे लाभार्थीयांना पंचायत समिती येथे वारंवार खेटे मरावे लागत आहेत. त्यांच्या अडचणींना उत्तर ग्रामसेवक देत आहेत ना गटविकास अधिकारी देत आहेत त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या पाहिजेत या मागणीसाठी नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये प्रा.रवींद्र चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण व संजय आप्पा बेळगे यांनी सविस्तर चर्चा केली.
 ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या चर्चेअंती ग्रामसेवकांनी लाभार्थ्याच्या मस्टरवर स्वाक्षरीच्या संदर्भात त्वरित मार्ग काढण्याच्या अनुषंगाने सकारात्मकता दर्शवली व शासन स्तरावरती लवकरात लवकर मार्ग काढून लाभार्थ्यांना त्यांचा मोबदला त्वरित मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामसेवक टी. जी.पाटील (तालुका अध्यक्ष ग्रामसेवक संघटना) येरसनवार, नवारे, बोंडले इ.ग्रामसेवक बाबासाहेब शिंदे, पत्रकार मनोहर तेलंग तिजारे पाटील, धोंडजी पाटील बेंद्रीकर शंकर मालीपाटील ,रावसाहेब पाटील शिंदे इत्यादी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या