अलिबाग तालुक्यातील पेझारी ग्रामीण रुग्णालयाला देवव्रत विष्णू पाटील यांचा मनसे दणका !

[ अलिबाग तालुका प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
आज दि.२७ फेब्रुवारी रोजी पेझारी ग्रामिण रूग्णालयात अक्षय तांडेल हे टी. टी. चे इंजेशंन घेण्यासाठी गेले असता त्यांना ते इंजेक्शन स्वतः बाहेरून खरेदी करायला सांगितले. याची माहिती अक्षय यांनी मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री देवव्रत विष्णु पाटील यांना दिली . या नंतर देवव्रत पाटील यांनी पेझारी रूग्णालयाच्या फार्मसिस्ट जितेद्र पाटील यांच्याकडे या बाबत चौकशी केली असता रूग्णालयाच्या स्टोअर मध्ये टी.टी. चे इंजेक्शन उपलब्ध नाही त्यामुळे रूग्णाला विकत घेण्यास सांगतो असे सांगितले व सदरचे इंजेक्शन गेल्या ६ महीन्यापासुन आमच्याकडे जिल्हा औषध भंडार मधुन मिळाले नाही त्यामुळे ते ऊपलब्ध करू शकलो नाही असे सांगितले.
सदरची माहीती मिळाल्या नंतर डाॅ.मोरे साहेबांना याबाबत देवव्रत पाटील यांनी फोन वरूनच जाब विचारला असता सदरच्या रूग्णालयाला टी.टी. चे इंजेक्शन तात्काळ ऊपलब्ध करण्याचे आदेश देतो म्हणुन सांगितले व त्याप्रमाणे लगेचच पेझारी रूग्णालयाच्या डाॅक्टर व क्लर्क यांसोबत बोलणं करून औषधे ऊपलब्ध करण्यास सांगितले. देवव्रत पाटील यांनी तातडीने दखल घेऊन प्रशासनाला कामाला लावून औषध ऊपलब्ध करायला लावल्याबद्दल रूग्णालयाचे फार्मसिस्ट जितेद्र पाटील यांनी देवव्रत पाटील यांचे आभार मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या