मनसेने केला जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील नर्सिंगच्या ANM व GNM विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

[ अलिबाग प्रतिनिधी:- अभिप्राव पाटील ]
जिल्हा रूग्णालय अलिबाग येथिल नर्सिगच्या ANM व GNM या प्रशिक्षण कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून सध्या कागदपत्रांची पडताळणी करून सबमिशन चालू आहे.

या सबमिशनच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांना जातीच्या अधारावर प्रवेश हवा आहे त्यांच्या कडे जात वैधताचे प्रमाणपत्र किंवा त्याचे प्रकरण सदर कार्यालयात जमा केल्याची पावती असल्या शिवाय कागदपत्रे स्विकारत नसल्याच्या तक्रारी मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य यांच्याकडे आज २९/१२/२०२२ रोजी येत होत्या ज्यामुळे कर्जत, श्रीवर्धन, माणगाव, महाड आशा दुर वरून आलेल्या विद्यार्थ्यांना निराष होऊन घरी परतावे लागत होते.

चालू असलेल्या प्रवेश प्रक्रिये बद्दल चौकशी अलिबाग येथिल नर्सिंग काॅलेजला देवव्रत विष्णु पाटील, प्रशांत वरसोलकर, राजेश टेमकर, गोरखनाथ पाटील व विद्यार्थी मिळून भेट देऊन गायीत्री मॅडम कडून माहिती घेतली व सदर प्रवेश प्रक्रिये बद्दलचे जात पडताळणी बद्दलचे शासन निर्णय जात पडताळणी कार्यालयातून मिळवून सदर प्रवेश प्रक्रियेत कागदपत्र जमा करताना जात पडताळणीच्या प्रमाणपत्राची गजर नसल्याची खात्री केली व जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी ठाणगे साहेब यांचं डाॅ.माने साहेब यांच्या सोबत फोन वरून बोलणी करून दिली, यावेळी डाॅ.माने साहेबांनी देवव्रत पाटील यांना जात पडताळणी वरून यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याचे सबमिशन थांबवणार नसल्याचे सांगितले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या