महाराष्ट्र स्टेट वेअर हौसींग काॅर्पोरेशन कर्मचारी महासंघ अध्यक्ष पदी श्री गाडीवान तर राज्य उपाध्यक्ष पदी भारत सोनटक्के यांची निवड !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे येथे कर्मचारी महासंघाचे बैठकीमध्ये श्री श्रीकांत गाडीवान यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तर संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री भारत सोनटक्के व महासचिव म्हणून श्री सुरेश वालगुडे आणि कोषाध्यक्षपदी रोहित लोंढे तसेच लातुर विभागा करीता लोहा येथील साठा अधीक्षक श्री शिवाजी वंजारे यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून एकमताने नुकतीच निवड करण्यात आली आणि नवनियुक्त कार्यकारणी जाहीर केली आहे.
भारतीय कामगार सेनेशी संलग्न असलेली मान्यता प्राप्त अशी सदरील महाराष्ट्र स्टेट वेअरहौसींग काॅर्पोरेशन कर्मचारी महासंघ आहे.
सदरील नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे मधुकर सुर्यवंशी, बावले, भांगे,सोनकांबळे, शिवराज पवार सह मित्रमंडळींनी अभिनंदन करुन कार्यकारिणीतील सर्वांनाच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या