प्रश्न सिमावर्ती संपर्क संवाद अभियानाचा संगम येथे समारोप उत्साहात संपन्न

■■■ देगलूर तालुक्यातील होटल येथून 7 डिसेंबर 10 रोजी डिसेंबर संपर्क अभियानास समारोप संगम येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली !! ■■■
(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
नांदेड जिल्ह्यातील सीमावृत्तीय भागातील काही गावांनी शेजारील तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाराष्ट्रात राहून विकास साधण्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील समस्या ऐकून घेण्यासाठी बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी होटल येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून या ‘संपर्क संवाद यात्रेस’ प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील लोकांची मोठी उपस्थिती होती.

जिल्ह्यातील देगलूर ,बिलोली, धर्माबाद , या प्रमुख तालुक्यासह अन्य तेलंगणा शेजारील असलेल्या गावातील नागरिकांनी तेलंगणा राज्यात ज्या सुख सुविधा सर्वसामान्य जनतेने पुरविल्या जातात त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार त्या सुविधा देण्यास कुचकामी ठरत आहेत असा आरोप करून शेजारील तेलंगणा राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाराष्ट्रातच राहून विकास साधण्याच्या या पार्श्वभूमीवर संपर्क संवाद अभियान च्या माध्यमातून सीमावृत्तीय लोकांचे समस्या ऐकून घेण्यासाठी बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी होटल येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून या संपर्क संवाद अभियानात सुरुवात करण्यात आली. ‌
ही संपर्क संवाद यात्रा होटल पासून येरगी, नागराळ, भक्तापूर, हनुमान हिप्परगा, नरंगल, सावरगाव, सांगवी उमर, मेदन केलूर, तमलुर शेळगाव, शेवाळा, बिलोली थडी हिप्परगा, सगरोळी, बोळेगाव, कार्ला फाटा, माचनुर, गंजगाव ते हुनगुंदा, संगम महादेव मंदिराच्या प्रांगणात या संपर्क संवाद अभियान दिनांक 10 डिसेंबर रोजी या संवाद अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी गोविंद मुंडकर, गंगाधर प्रचंड, व्यंकट पाडवे यांच्यासह अनेक सखोल मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन राजु पा. शिंदे यांनी केले.
संवाद अभियान समितीचे प्रमुख समन्वयक गोविद मु़डकर, गंगाधर प्रचंड, राजु शिंपाळकर शिंदे, विठ्ठलराव चुकाबटले, नरसिंगराव देशमुख, व्यंकट पाडवे, देविदास कोंडलाडे, नागनाथ पा. सावळीकर, गौशोद्दीन कुरेशी, निवृत्ती कांबळे माजी जि.प.सदस्य’ शेतकरी नेते गणेश पा.परभणी, कैलास एसगे, सुधिर बिन्दु शेतकरी नेते, भिमराव पा. शिंदे, नविन पा. वनाळीकर, शंकर मावलगे, सोमनाथ नागुरे परभणी, प्रा. बालाजी चिरडे, शिवलिंग शाधावडे, अरविंद पा.नांगणीकर, व्यंकट गुजरवाड, गणेश गिरगांवकर, प्रसाद देशपांडे, शिवमनी नागुलवार, शिरगिरे दतराम, सय्यद रियाज, धरमपुरे, बसलिंग हाडपे, संतुकराव पा.सावळी यांच्यासह सिमावती भागातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या