“महात्मा बसवेश्वरांनी उपजिविकेचे नव्हे तर जीवनाचे शिक्षण दिले” – डॉ.बसवलिंग !

[ उस्मानाबाद/उमरगा प्रतिनिधी – प्रदीप कांबळे ]
पट्टदेवरू जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये समाजाला उपजिविकेचे नव्हे तर जीवनाचे शिक्षण दिले त्यामुळे त्यांचे शिक्षणविषयक विचार आजही आधुनिक काळामध्ये प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन हिरेमठ संस्थान भालकी, कर्नाटक चे अध्यक्ष डॉ.बसवलिंग पट्टदेवरू यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला संयोजन समिती, आय.क्यु.ए.सी. आणि अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.3 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये कोविड 19 च्या निर्बंधाला अनुसरून महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाललेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे हे होते तर विचारमंचावर भालकी, कर्नाटक येथील सुप्रसिध्द लेखक, अभ्यासक तथा भाषांतरकार प्रा.राजू जुबरे, आय.क्यू.ए.सीचे चेअरमन कॅप्टन प्रा.डॉ.बाळासाहेब गोडबोले, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रोफेसर श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य प्रा.मनोहर कबाडे, प्रा.बी.एम.जाधव, संयोजक प्रा.डॉ.मनोहर चपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ.बसवलिंग पट्टदेवरू म्हणाले की, महात्मा बसवण्णानी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. समाजामधील भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न केला. समाजातील लोकांचे अंतरंग साफ करण्याचे शिक्षण त्यांनी 770 शरणार्थ्याना दिले.
आपण आज आपण विज्ञानाने मोठे होत आहोत परंतु हृदय मात्र आपले संकुचित होत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. महात्मा बसवेश्वरांनी तन, मन आणि भाव हे विकासाचे सूत्र सांगितले आहे. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.राजू जुबेर महात्मा बसवेश्वर यांचे शिक्षण विषयक विचार या विषयावर बोलताना म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकामध्ये समाजामध्ये समानता निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांनी बहुजनामध्ये आत्मभान निर्माण केले. मानवाच्या कल्याणासोबत जिवात्माचा विकास महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.यावेळी सुप्रसिध्द विचारवंत तथा जेष्ठ इतिहासकार प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंयोजक डॉ.रत्नाकर बेडगे आणि प्रा.सुरेन्द्र स्वामी यांनी केले, प्रास्ताविक संयोजक डॉ.मनोहर चपळे यांनी केले तर समारोपीय मार्गदर्शन प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी तर आभार प्रा.धोंडीबा भुरे यांनी मानले. या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.संजय गवई, प्रा.डॉ.शीतल येरुळे, प्रा.डॉ.श्रद्धा अवस्थी, प्रा.डॉ.उमा कडगे, प्रा.डॉ.अश्विनी रोडे, प्रा.व्यंकट दुडिले, प्रा.किसनाथ कुडके, प्रा.डॉ.राहूल डोंबे, प्रा.शंकर भोसले, प्रा.परमेश्वर पाटील, प्रा.आशीष स्वामी, शुभम बिरादार, विरेश कोरे, राम पाटील, संतोष येंचेवाड, योगिराज माकणे, संजय गिरी व केदार इटगे यांनी परिश्रम घेतले या व्याख्यानमालेला शहरातील पत्रकार बंधू, अभ्यासक, संशोधक, जेष्ठ नागरिक, रसिक श्रोते, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या