प्रा.हणमंत पटणे यांना राज्यस्तरीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2023 बावलगावचे शिक्षणप्रेमी प्रा. हणमंत गंगाधर पटणे यांना देण्यात आला आहे. 

        हणमंत पटणे हे मागील 13 वर्षांपासून इंजिनियरिंग पदवी आणि पदविका च्या विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य आणि इंग्रजी हा विषय शिकवतात. सध्याला ते वाशी येथील अग्नेल पॉलिटेक्निक महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसियशन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे ते खजिनदार आहेत. त्यांनी आपल्या गावचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक विकास व्हावा आणि गावातील शाळेचा विकास व्हावा म्हणून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कार्य करीत असून त्याच्या पुढाकाराने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आली आहे.त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिलेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण दि 30 जुलै 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जालना येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

              हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या, विभाग प्रमुख, इंग्लिश लॅंग्वेज असोसियशनचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच मित्र परिवार , गावातील नागरिक, माधव पटणे, शिवकुमार पटणे, आनंदराव नामगोंडे, गंगाधर पाटील, इरेस ठोमशे, वैजनाथ नामगोंडे, माणिक शिरगिरे, विठ्ठल मदणुरे, नागनाथ धनुरे,दत्ता म्या कलवार, अशोक पटणे, अरुण नामगोंडे इत्यादीने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या