महाराष्ट्र विकास आघाडी च्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी गंगाधर पेंटे याना निवेदन देण्यात आले.

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
लोहा शहरात वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी शहराच्या आवश्यक ठिकाणी जर सीसीटीव्ही लावले असते तर कदाचित चाकू भोसकविणारे, जबरी चोरी तसेच दरोडा टाकणारे अज्ञात चोरटे पकडण्यास पोलिसांना मदत झाली असती ? असा सवाल करीत सीसीटीव्ही लवकर बसवावे अशी मागणी महाराष्ट्र विकास आघाडी चे जिल्हाद्यक्ष शुभम उत्तरवार यांनी केली.
       शहरातील आवश्यक त्या भागात म्हणजे बसस्थानक , चौक, भाजी मंडई, दुसरी कमान मोंढा परिसर असा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे पत्र पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मुख्याधिकारी याना दिले पण त्यावर पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
     पोलिसांची अपुरी संख्या वाढते शहर त्यातच मुख्य बाजारपेठ असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.या सगळ्या घटनेत पोलिसां कडे आपण बोट दाखवत असतो पण शहराची काळजी घेताना नगर पालिका प्रशासनानेही जर वेळीच पोलिसांच्या पत्राची गांभीर्याने दाखल घेऊन सीसीटीव्ही बसविले असते तर कदाचित चोरीच्या घटना उघडकीस येण्यास पोलिसांना सहकार्य झाले असते बहुतांश शहर तसेच काही खेड्यात ही सीसीटीव्ही बसविले जातात मग लोह्यात का शक्य नाही .मुख्याधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे पोलीस निरीक्षक तांबे यांनी तातडीने पत्र देऊन सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाने बेदखल केले ही अयोग्य असून तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे 15 दिवसात बसावा अन्यथा पालिके समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र विकास आघाडी चे जिल्हाद्यक्ष शुभम उत्तरवार यांनी दिला.
    यावेळी उपस्थित पत्रकार तथा महाराष्ट्र विकास आघाडी चे तालुकाअध्यक्ष गोविंद पवार, पत्रकार संतोष चेउलवार, पत्रकार किरण दाढेल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या