अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकरी बंधू, बैलगाडी प्रेमींनी आमदार महेंद्र हरी दळवी यांची काढली रथात मिरवणूक !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील हजारो शेतकरी बंधू बैलगाडी प्रेमींनी आदरणीय दमदार आमदार महेंद्र हरी दळवी यांची रथात मिरवणूक काढली, सत्कार केला आणि राज्य सरकारचे आभार मानून साजरा केला विजयोत्सव.

सर्वोच न्यायालयाचा निर्णय लागताच काल भेरशे येथे मोठया उत्साहात बैलगाडी चालक मालक संघटना आणि बैलगाडी प्रेमी यांनी आमदार साहेबांचे स्वागत त्यांना मुख्य रस्त्यापासून भेरशे येथे शर्यतीच्या मैदानात रथात मिरवणूक काढून केले.

हजारो शेतकरी बैलगाडी प्रेमींनी मोठया उत्साहात ह्या मिरवणुकीत भाग घेतला आणि शर्यत सुरू करणेसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्या बद्दल त्यांच्या लाडक्या दमदार आमदारांचे मनपूर्वक धन्यवाद मानले आणि राज्य सरकारचे देखील आभार मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या