अंजनी ग्रामपंचायत चे सरपंच महेश हांडे यांचा तालुक्यातील सरपंचांनी आदर्श घ्यावा – सुभाषराव साबणे.

●● राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना मा.प्राचार्य मनोहर धोंडे यांच्या हस्ते अंजनीचे सरपंच महेश पाटील हांडे यांच्यासह सौभाग्यवतीचा सत्कार ! ●●
(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
तालुक्यातील मौजे अंजनी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सरपंच संघटना तालुका अध्यक्ष महेश पाटील हांडे व उपसरपंच मा.बालाजी मुंडकर यांचा  वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा  करण्यात आला.

या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे इतर सरपंच, पञकारांनी महेश पाटील हांडे यांनी अंजनी गावात अनेक ग्रामस्थ नगरिकांना घरकुल, निराधार, शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा लाभ मिळवून देत ग्रामपंचायत च्या माध्यमातून विकास कामे केल्यामुळे महेश पाटील यांचे कौतुक केले.

माजी आमदार मा.सुभाषराव साबणे यांनी आपल्या मनोगतामध्ये माझ्यापेक्षा ही चांगले काम करण्याची शैली सरपंच महेश पाटील हांडे यांच्यात आहे असे म्हणाले.
तालुक्यात पञकार बांधवांनी मौ.अंजनी ग्राम पंचायतचे व महेश पा.हांडे यांच्या कार्याच्या बातम्या प्रकाशित करुन प्रसिद्धी दिली असल्यामुळे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात अंजनी ग्राम पंचायत चे नाव लौकिक झाले. म्हणून विठ्ठल चंदनकर, अशोक दगडे, भिमराव बडूरकर, संजयकूमार पोवाडे, सुनिल जेठे, मुकिंदर कुडके, साहेबराव दावलेकर या पञकारांचा सत्कार केला.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सुभाषराव साबणे, लक्ष्मणराव ठक्करवाड, वैजनाथ अण्णा तानसुरे, विठ्ठलराव ताकबिडे, निळकंठराव चोंडे, यांच्यासह पञकार, ग्रामस्थ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते. 
सुञसचलन अॕड.नागेश मुकदम तर आभार महेश पाटील हांडे यांनी केले. प्रमुख पाहूण्यांचे व पञकार, मिञमंडळ, ग्रामस्थांचे आभार मानले. महेश पा.हांडे आपल्या वाढदिवसानिमितांने आॕरकेस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता. या आॕरकेस्ट्राच्या गाण्याचा आनंद अंजनी ग्रामस्थांनी घेतला.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या