नायगावात सौभाग्यवती महिला ग्रुपच्या वतीने हाळदी कुंकवाचा कार्यक्रम थाटात साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील सतीश मेडेवार यांच्या निवासस्थानी आर्य वैश्य नगर आर्य वैश्य समाजातील सर्व बावीस महिला एकत्र येऊन सौभाग्यवती महिला ग्रुपच्या वतीने मकर संक्रांतीचे निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला शहरातील सौभाग्यवती महिला ग्रुप आर्य वैश्य नगर नायगाव येथे या ग्रुपच्या वतीने धकाधकीच्या जीवनामध्ये एक आगळा वेगळा आनंद मिळावा म्हणून सर्व महिला एकत्र येऊन वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

यावेळी महिलांनी राधा कृष्णाचे गोकुळ निर्माण तयार करून रंगरंगोटी, रांगोळी काढून, श्रीकृष्णाचे रूप जयेश चौधरी तर कुमारी चिन्मयी चौधरी हिने राधाचे रूप घेतले होते.

शहरातील सर्वधर्मसमभाव समजून सर्व समाजातील महिलांना बोलावून तिळगुळ देऊन ग्रह उपयोगी साहित्य प्रत्येक महिलांचे स्वागत केले व नाश्ता देण्यात आला या कार्यक्रमाचा महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचे आयोजक सौ उषा मेडेवार , सौ नीलिमा चौधरी,सौ मंजुषा गादेवार, सौ मोनिका चंदावार, सौ ऐश्वर्या कत्रूवार, सौ मंजुषा गादेवार , सौ सुलोचना अंकुलवार ,सौ अर्चना गादेवार, सौ पुष्पा मेडेवार, सौ वनिता चौधरी, सौ सोनाली गुंडाळे ,सौ सुजाता गादेवार, सौ संगीता कवटीकवार, सौ अश्विनी पबशेटवार , सौ सुनिता लाभशेठवार, सौ सुनीता बोरलेपवार, सौ सुरेखा कोत्तावार,सौ अंबिका बच्चेवार सौ सुनीता काशेटवार , सौ मोनाली देमेवार, सौ सुनिता गुंडाळे ,सौ अनिता चल्लावार, सौ अनुराधा उत्तरवार महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकत्र यशस्वी केला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या