लालवंडी येथे मल्लपटू यादव महाराज यांनी मानाची कुस्ती जिंकली…!

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 तालुक्यातील मौजे लालवंडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही सर्वधर्म समभाव या विचाराने कै. शिवराम आप्पा लंगडापूरे व शंकरराव पाटील लंगडापूरे, यांच्या अध्यात्माचा वारसा घेऊन मा. बाबूराव पाटील लंगडापूरे, भगवान पाटील लंगडापुरे हे सर्वांना सोबत घेऊन गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करतात यांच्या प्रेरणेतून गावामध्ये सर्व जातीपातीचे लोक आनंदाने यात्रा समिती मध्ये भाग घेऊन यात्रा महोत्सव आनंदाने पार पाडतात.
गावातील राजकारण यात्रे मध्ये कधी दिसून आले नाही. परिसरातील सर्वात मोठी कुस्ती लालवंडी तालुका नायगाव येथे “गैर पीर” दर्गा यात्रा महोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत प्रमुख आतिथी व प्रतिष्ठीत मंडळी यांच्या उपस्थितीत जंगी कुस्त्यांचा फड रंगला .. नारळाची कुस्ती त सर्वात मोठी कुस्ती राजू महाराज या पैहलवानानी मानाची कुस्ती जिंकली.
या कार्यक्रमाठी प्रा. जीवन पाटील चव्हाण, महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे सरचिटणीस माधवदादा जमदाडे, हे उपस्थिती होते. या स्पर्धेचे आयोजक भाजपा नेते तथा चेअरमन भगवानराव पाटील लंगडापुरे, (आडत व्यापारी असो. अध्यक्ष) सरपंच प्रतिनिधी प्रकाश जोंधळे, उद्धव पाटील संगेपवाड, बळवंत शिंदे, शिवाजी पा. जाधव, सुरेश पा. लालवंडे, बालाजी पा . बामनपल्ले, शिवराम आप्पा येरसनवाड, व्यंकटराव इंद्रे, गुणु पाटील, बाबाराव इंगळे व समस्थ गावकरी उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेत नांदेड, परभणी, लातूर येथील मल्ल पटू यादव महाराज सलगरा, तिरुपती तोडे आंतरगाव येथील मल्लपटू नि बाजी मारली.
परिसरातील पहेलवान मोठ्या संखेने सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी लालवंडी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या