श्री परमपूज्य हवा मल्लिनाथ महाराज यांची भव्य तिरंगा रॅली संपन्न ; नायगावात मल्लिनाथ महाराजांचे जंगी स्वागत

[ नायगाव बा तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
संपूर्ण भारतात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू केरला मराठवाडा विविध राज्यात हजारो एकर मध्ये साडेपाच हजार शिवलिंग स्थापना करून जागतिक उपक्रम राबवणाऱ्या सर्व धर्म समभावाचे प्रत्येक भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे परमपूज्य ओम श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी कर्नाटक तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला लाखोंच्या भाविकांच्या उपस्थिती मोठी यात्रा भरत असते.

याच जय भारत माता सेवा समिती ट्रस्ट दिल्ली अंतर्गत हे  महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कहाळा टोल, नायगाव शहर ते नरसी रामतीर्थ भोपाळा येथे तिरंगा रॅली व तिळगुळ वाटप, प्रसाद रुपी उसाचारस या सह महामानव स्वामी विवेकानंदजी व राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली परमपूज्य श्री हवा मल्लिनाथ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांच्यासह भाविक भक्तांच्या नेतृत्वात नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर लगत असलेल्या काहाळा टोल, नायगाव मतदार संघासह तालुक्यातील व शहरासह नरसी, रामतीर्थ, किनाळा, हिप्परगा, शंकरनगर, भोपाळा अशा या सर्व लाखो माता भगिनी भावीक भक्तांना आशीर्वाद दिले.
तसेच या महत्वपूर्ण रॅली मध्ये यशस्वी करण्यासाठी दासराव पाटील हंबर्डे, श्याम गायकवाड, सुभाष पवार, हरिचंद्र पाटील चव्हाण, गजानन चौधरी, वसंतराव पाटील जाधव, बापूराव वाघमारे, संभाजी भोपाळकर, व्यंकटराव मामा पुजारी, यशवंतराव शिंदे, उद्धवराव पाटील बोडके ,पप्पू पाटील बिदर मनी भाई, बालाजी नरसीकर, श्रीराम शिंदे, बापूराव हंबर्डे, नारायण महाराज, प्रताप वाघमारे, दत्ता खंडगावकर, महानंदा गायकवाड, किशोर महाराज धर्माबादकर, शंकरराव पाटील हंबर्डे, विकास पाटील, माधवराव कार्लेकर, गोविंदराव हत्ते सचिन शिंदे सह हजारोच्या संख्येने भक्त उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या