आनंदा मल्हारी गोणेकर यांची उमरी तालूका अध्यक्षपदी तर संतोष हैबतकर यांची उमरी कामगार आघाडी अध्यक्षपदी निवड !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी आनंद सुर्यवंशी )
दि.१७-०६-२०२१ रोज गूरुवारी सामाजिक कार्यकर्ते आनंदा मल्हारी गोणेकर यांची उमरी तालूका अध्यक्षपदी तर संतोष हैबतकर यांची उमरी कामगार आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

स्व.संजय सूर्यवंशी शिवनगावकर यांच्या अकाली निधनानंतर उमरी तालूक्याच्या मानवहीत लोकशाही पक्षाची पूढील धूरा सांभाळण्यासाठी व पक्ष बळकटीसाठी मानवहीत लोकशाही पक्षाचे मराठवाडा सचिव मा.श्री.बालासाहेब खानजोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रविन जी बसवंते साहेब (जिल्हा यूवाध्यक्ष नांदेड) व राष्ट्रीय अध्यक्ष आ.सचिनभाऊ साठे यांचे कट्टर समर्थक नांदेड जिल्हा संपर्क प्रमूख मा.श्री.किशनराव जी ईंगळे व इतर पदाधिकारी व मान्यवर यांच्या प्रमूख उपस्थितीत उमरी येथील वस्ताद लहुजी साळवे चौकात तालूक्यातील समाज कार्यकर्ते मा.श्री.आनंदा मल्हारी गोणेकर( कळगावकर) यांची उमरी तालूका अध्यक्षपदी तर मा.श्री.संतोष हैबतकर यांची उमरी तालूका कामगार आघाडी अध्यक्षपदी नियूक्ती प्रमानपञ देऊन निवड करण्यात आली.
यावेळी मा.श्री.शाहीर ज्ञानेश्वर गायकवाड नागठाणेकर , मूदखेड तालूका कामगार आघाडी अध्यक्ष प्रल्हादजी राहेरे, दिगंबर कवडीकर ,करण शिंदे (का.आ.ता.उपाध्यक्ष उमरी) दत्ताञ्य कवडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या