मानवहित लोकशाही पक्षाची बैठक संपन्न, नायगाव तालुका कार्यकारणीची निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नरसी शहरातील विश्रामगृह येथे मानवहित लोकशाही पक्षाची नुकतीच बैठक संपन्न झाली असून या बैठकीत नायगाव नूतन तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आलेली आहे.
 या बैठकीला उपस्थित मराठवाडा अध्यक्ष रमेश सूर्यवंशी,  जिल्हाध्यक्ष मालोजीराजे वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भालेराव, जिल्हा सचिव सतीश धनवाडे, तालुका अध्यक्ष वाडेकर, महिला जिल्हाध्यक्ष जांबळे मॅडम, सर्व मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मानवहित लोकशाही पक्षांमध्ये जाहिर पक्षप्रवेश केले, अक्षयभाऊ बोयाळ यांची नायगाव तालुकाध्यक्ष पदी, तर पुनम धमनवाडे गोळेगांवकर-युवक तालुका अध्यक्षपदी आणि मारोतीभाऊ गायकवाड-मीडिया तालुकाध्यक्षपदी यासह सोनू सूर्यवंशी-मीडिया उपाध्यक्षपदी  सूर्यकांत आनंदा फुगारे-युवक तालुका उपाध्यक्षपदी तर विकास मनोहर घंटेवाड-तालुका सहसचिव पदी, ज्ञानेश्वर झुंजारे बळेगावकर-तालुका कार्याध्यक्षपदी या सर्व पदाधिकार्यांची निवड करून अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या