■ मा॑दाटणे ग्रामपंचायत कोरोना मुक्त I

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]

जिल्हास्तरीय कोरोणा मुक्त ग्रामपंचायत स्पर्धेत म्हसळा तालुक्यातून ग्रुप ग्रामपंचायत मा॑दाटणे चा प्रथम क्रमांक आला याबद्दल आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभापती छायाताई मात्रे, उपसभापती संदीप चाचले, सदस्य मधुकर गायकर, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांचे हस्ते ग्रुप ग्रामपंचायत मा॑दाटणेला कोरोणा मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला विस्ताराधिकारी सुनील गायकवाड, कृषी अधिकारी मंगेश साळी, श्री बक्कर , श्री पुसळकर , खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री कैलास घरत , श्री राजेश मोहिते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्रुप ग्रामपंचायत मा॑दाटणे चे सरपंच चंद्रकांत लक्ष्मण पवार यांनी या वेळी हा पुरस्कार कोरोना पथक सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला असे जाहीर केले तर आदर्श ग्रामपंचायत बनण्याकडे मा॑दाटने ग्रुप ग्रामपंचायत ची वाटचाल सुरू आहे असे गौरवोद्गार सभापती छायाताई म्हात्रे यांनी काढले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना विनयकुमार सोनवणे सर यांनी आमच्या ग्रामपंचायत मध्ये 95 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून लवकरच शंभर टक्के लसीकरणाचा टप्पा पार करू असे सांगितले , यावेळी ग्रामपंचायत कोरोना नियंत्रण पथकातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा सेविका, पोलीस पाटील , स्वयंसेवक यांना देखील कोरोना वीर सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी केंद्रप्रमुख श्री नरेश सावंत यांनी केले तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला माजी सरपंच श्रीपत मनवे, माजी सरपंच राजाराम धुमाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार , पाष्टी , मोरवणे,‌ मा॑दाटणे , पांणदरे , येथील गाव अध्यक्ष , महिला मंडळ अध्यक्ष , ग्रामस्थ , पीएनपी माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक , प्राथमिक शिक्षक श्री म ता पवार , संभाजी पथारे, संतोष गारगोटे, कातोरे , ललीत पाटील , बिलाल शिकलगार , पोलीस पाटील स्नेहा पवार , व अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक व सामाजिक अंतर या त्रिसूत्री चे पालन करण्याचा व कोरणा ची तिसरी लाट रोखण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या